Marathi Movie Aajcha divas majha – आजचा दिवस माझा

2
7332

Marathi Movie Aajcha divas majha – आजचा दिवस माझा

मागील वर्षी मराठी चित्रपटसृष्टीवर प्रभाव पाडलेल्या तुकाराम या चित्रपटाचे लेखक अजित दळवी, प्रशांत दळवी आणि दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी पुन्हा एकदा एक आधुनिक कल्पना मराठी रसिकां समोर सादर करत आहेत … आजचा दिवस माझा या चित्रपटाच्या माध्यमातून.

Ajcha divas majha

चंद्रकांत कुलकर्णी यांनी आजचा दिवस माझा या चित्रपटा अगोदर कायद्याचे बोला, बिनधास्त, कदाचित आणि तुकाराम असे सुपरहिट सिनेमे दिग्दर्शित केले आहेत.

आजचा दिवस माझा हा चित्रपट राजनीतीवर आधारित आहे, थोडक्यात ही कथा आहे एका मुख्यमंत्र्याची ज्याला काहीतरी करायचे आहे… पण हे काहीतरी वेगळे करण्यासाठी त्याला किती धडपड करावी लागते, विरोधकांना कसे तोंड द्यावे लागते … आणि मुख्यम्हणजे राज्यातील सनदी अधिकार्‍यांची भूमिका काय असते..

चित्रपटात पुष्कर श्रोत्रि एका वेगळ्या भूमिके मध्ये दिसणार आहे, तर अश्विनी भावे यांनी मुख्यमंत्र्यांच्या बायोकोची भूमिका साकारली आहे.

Ashvini bhave from aajcha divas majha

उत्तम कथा, उत्तम दिग्दर्शक, आणि सर्वोत्तम कलाकार..

म्हणजे आजचा दिवस माझा चित्रपट उत्कृष्ट असणारच यात शंकाच नाही…

चित्रपटच्या ट्रेलर मधील संवाद पण उत्तम….

 मनात येईल ते ते होईल

कथा आहे एका दिवसाची …. की एका रात्रीची…!

कथा आहे विश्वासराव मोहिते(सचिन खेडेकर) या प्रामाणिक मुख्यमंत्र्याची, ज्यांना सामान्यांसाठी काही करायचे आहे.. पण याच वेळी त्यांचा सामना होतो तो एका IAS अधिकार्‍याशी (महेश मांजरेकर)..

आणि सुरू होतो राजकारणाचा खेळ..

कोण जिंकेल एक मुख्य सनदी अधिकारी …. की एक प्रामाणिक मुख्यमंत्री..?

या दोघांच्या युद्धात सामान्य माणसाचे काय?

या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपणास मिळतील २९ मार्च २०१३ रोजी आपल्या नजीकच्या चित्रपट गृहात.

[tube]8tOhfHc5tME[/tube]

2 COMMENTS

  1. खुप खुप खुप खुप चित्रपट आहे, सर्वानी पाहायला पाहिजे आणि मुख्यत्वे राजकारणी, सरकारी अधिकारी लोकांनी..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here