Marathi Bloggers – मराठी ब्लॉगर्स

2
2670

Marathi Bloggers – मराठी ब्लॉगर्स

Marathi Bloggers

ब्लॉग म्हणजेच अनुदिनी, पूर्वी अनेकजण रोज न चुकता डायरी लिहायचे म्हणजे अजूनही काही लिहितात पण प्रमाण नक्कीच कमी आहे. मी पण शाळेत असताना डायरी लिहायला सुरुवात केलेली, पण तो योग काही जास्त दिवस जुळून आला नाही, कारण हे आपण का लिहितो कुणासाठी लिहितो याचा मला काय उपयोग हे समजून न घेताच फक्त शाळेत संगितले म्हणून रोजच्या घडामोडी लिहीत होतो.

असो.. मुद्दा हा की याचेच इंटरनेट च्या मायाजालावरील नाव म्हणजे ब्लॉग.

सुरूवातीला भाषेच्या अडसरामुळे मराठी ब्लॉग्स चे अस्थित्व शून्याच्या बरोबरच होते, खूपच कमी संकेतस्थळे मराठी भाषेत होती, पण हळू हळू तत्रज्ञान बदलत गेले आणि भाषेचा अडसर दूर झाला तसे मराठी भाषेतील संकेतस्थळे आणि ब्लॉग्स वाढत गेले. (इंटरनेटवर मराठी भाषेत कसे लिहावे हे जाणून घेण्यासाठी येथे टिचकी मारा  )

आज इंटरनेट वर अनेक मराठी भाषेतील ब्लॉग्स/अनुदिनी आढळतील आणि मुख्य म्हणजे यातील ७०% पेक्षाही अधिक ब्लॉग्स/अनुदिनी हे खरेच खूपच सुंदर आहेत , हे इथे नमूद करण्याचे कारण म्हणजे हेच प्रमाण इंग्रजी भाषेच्या बाबतीत ४०% एवढे आहे. इंग्रजी भाषेतील ब्लॉग्स मध्ये उचलेगिरी जास्त प्रमाणात आढळते. तशी ती मराठीतही आहे , पण अजून तरी त्याचे प्रमाण कमी आहे. असो हा आजच्या लेखाचा मुद्दा नाही. पण यावर देखील लवकरच लिहिन, आपणच आपले लेख साहित्य अश्या उचलेगिरी करणार्‍यान पासून कसे वाचवू शकतो.

आजच्या लेखाचा मुद्दा आहे मराठी ब्लॉगर्स. तर आपण मराठी ब्लॉगर्स… थोडीशी तंत्रज्ञानाशी ओळख असलेले(म्हणजेच ब्लॉगस्पॉट किंवा वर्डप्रेस) आणि लेखनाची आवड असेलेली आपण मंडळी ब्लॉग सुरू करतो. यात आपला उद्देश हा आपले लेख इतरांनी वाचावेत त्यावर टिप्पणी द्यावी एवढाच असतो.

मग ब्लॉगला वाचक मिळतात, ब्लॉग वेग वेगळ्या मराठी ब्लॉग लिस्टिंग संकेतस्थळांवर जोडला जातो (marathiblogs.in, marathiblogs.net). आणि ब्लॉग च्या प्रवासाला सुरुवात होते. पण अनेक ब्लॉग हे सुरुवातीच्या सहा महिन्यातच दम तोडतात , कारणे अनेक असतात …

काही टिकतात त्यांचे पण लेखांचे प्रमाण महिन्याला ६ लेखांवरून महिन्यात एखादा लेख असे होते. अश्या ब्लॉग्स ना वाचक पण खूप असतात .  अनेकदा तर ब्लॉग्स वरील टिप्पणी मध्ये पुढील लेख लवकर लिहा अश्या वाचकांच्या विनवण्या वाचावयास मिळतात.

तरीदेखील यातीलही अनेक ब्लॉग्स दम तोडतात. कारणे पुन्हा तीच… इथे मला नमूद करायला आवडेल की  पाककृतीवर आधारित ब्लॉगना वाचकही भरपूर असतात आणि इतर ब्लॉग्स च्या तुलनेत या ब्लॉग्सची वयोमर्यादाही जास्त असते.

आज मराठी ब्लॉगर्स साठी ही जी लेखमालिका मी सुरू केली आहे त्यातील हा पहिलाच लेख, यात माझ्या नुसार मराठीब्लॉग्स बंद पडण्याची काही कारणे आणि काही उपाय मी सांगणार आहे. सर्वच तुम्हाला पटतील किंवा एवढीच करणे आहेत असे नाही.

कारणे,

१. वेळ नसणे.

हे सर्वाधिक ब्लॉगर्स चे कारण असते, ऑफिस मधील किंवा घरातील कामांमुळे अनेकांना ब्लॉग लिहायला वेळ मिळत नाही.

२. वाचकांचे प्रतिसाद न मिळणे.

३. ब्लॉग सुरू करताना जो विचार केला होता ते लिहून झाले आता नवीन काय लिहायचे?

४. उत्साह कमी होणे.

करणे अजूनही खूप सापडतील, पण उपाय खूप कमी.

मी वर लिहिले मराठी ब्लॉग्स खूपच उपयुक्त आणि माहिती पर असतात पण तरीही फक्त ५% मराठी ब्लॉग्सर्स हे प्रोफेशनल ब्लॉग्स लिहितात आणि त्यावरून उत्पन्न मिळवतात.

(तर देशातील २५% इंग्रजी भाषेतील ब्लॉगर्स प्रोफेशनल आहेत, जसे अमित अगरवाल(labnol.org), हर्ष अगरवाल(shoutmeloud.com) या यादीमध्ये मराठी नाव अजून तरी सापडत नाही, पण मराठी ब्लॉगर्स चे ब्लॉग वाचून लवकरच यात अनेक मराठी ब्लॉगर्स ची नावे सामील होतील… हे नक्की)

आणि मिळणार्‍या उत्पन्ना मुळे हे ब्लॉग्स टिकतात देखील.

आता तुम्ही म्हणाल ब्लॉग्स मधून किती उत्पन्न मिळू शकते, तर यावर मी आपल्याला स्वताच्या अनुभवावरून सांगतो जर आपल्या ब्लॉग चे वाचक दिवसाला १००० पेक्षा जास्त असतील तर आपण फक्त गूगल अॅडसेन्स च्या माध्यमातून कमीत कमी ५ -१० डॉलर म्हणजेच ३०० ते ६०० रुपये कमवू शकता आणि ही कमाई रोज सुरूच राहते जरी आपण रोज ब्लॉग लिहिला नाही तरी.

कधी कधी हा उत्पन्ना मुळे अनेक ब्लॉग टिकून राहतात.

पुढील लेखामधे मी मराठी ब्लॉग्स मधून उत्पन्न कसे मिळवावे, ब्लॉग्स-स्पॉट की वर्डप्रेस, मराठी ब्लॉग्स साठी SEO या विषयांवर लिहिणार आहे … लवकरच .. 🙂

आपला ब्लॉग आजच रजिस्टर करा … मराठीब्लोग्स.इन वर

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here