Marathi Movie 72 mail Ek pravas – ७२ मैल एक प्रवास

4
5204

Marathi Movie 72 mail Ek pravas – ७२ मैल एक प्रवास

Marathi movie 72 mail ek pravas

 

  • निर्माता : अक्षय कुमार, ट्विंकल खन्ना, अश्विनी यार्दी.
  • दिग्दर्शक : राजीव पाटील
  • कलाकार : स्मिता तांबे, (बालकलाकार) – चिन्मय संत , चिन्मय कांबळी, श्रावणी सोळसकर, इशा माने.

बॉलीवुड स्टार अक्षय कुमार याच्या प्रॉडक्शनचा हा पहिलाच मराठी चित्रपट..!

७२ मैल .. एक प्रवास हा चित्रपट अशोक व्हटकर यांच्या ‘७२ मैल’  या कादंबरीवर आधारित आहे . एका मुलाला त्याचे वडील त्याच्या इच्छे विरुद्ध बोर्डिंग मध्ये टाकतात , मात्र लवकरच तो मुलगा बोर्डिंग मधून पळून जातो आणि सुरू होतो त्याचा घरी परतण्याचा प्रवास सातारा ते कोल्हापूर तो पण पायी.

याच प्रवासात त्याला राधाक्का भेटते, आणि त्यांचा एकत्र पायी प्रवास सुरू होतो. हाच प्रवास या चित्रपटातून अनुभवास मिळणार आहे.

[tube]XBcfc9ko1HU[/tube]

७२ मैल एक प्रवास, ९ ऑगस्ट २०१३ रोजी आपल्या जवळील चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.

 

 

4 COMMENTS

  1. ७२ मैल ही अशोक व्हटकरांची खूप वर्षापूर्वी वाचलेली कादंबरी, आज ही कादंबरीचे नाव आणि लेखक आठवतो – कारण एका लहान मुलाला त्याच्या घरी पोहोचवण्यासाठी ओळख पाळख नसणाऱ्या एका बाईने केलेला प्रवास आणि त्यासाठी स्वत:ची इज्जत विकण्यास मागेपुढे न पाहणे पण शेवटी त्या मुलाला घरी पोहोचवणे – अंगावर शहारे आणणारी कादंबरी – आज १५/२० वर्षानंतर न विसरलेली. तिच्यावर चित्रपट बनवण्याचे धाडस करणाऱ्या निर्मात्यांना हार्दिक शुभेच्छा. Standing ovation मिळावे अशीच कहाणी सशक्त होती. पाहायला विसरू नका.

  2. हि कादंबरी वाचणेच सोडा पण फिल्म बघून रडावेसे झाले आहे………अक्षरशः डोळ्यातून अश्रू गळाले……..हि कादंबरी वाचनाची खूप इच्छा होत आहे आणि मी वाचीनच…….परंतु खंत या गोष्टीची वाटते कि लेखकाची आणि राधा आईची नंतर कधीच भेट झाली नाही…..मनामध्ये खूप प्रश्न निर्माण करून जातात कि…….जात…….गरिबी………आणि एक मन कित्येक गोष्टीवर आपला प्रभाव पाडून जातात…..माझ्या मनाला पार ठेचाळून जाण्याऱ्या फिल्म & कादंबरी मध्ये याचा आणखी समावेश झाला………जय भीम……नमो बुद्धाय……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here