क्षितिज झारापकर दिग्दर्शित आणि डॉ. देवदत्त कपाडीया निर्मित धुरंधर भाटवडेकर हा विनोदी चित्रपट २९ मे रोजी प्रदर्शित होत आहे.
धुरंधर भाटवडेकर .. दो बेचारे बिना सहारे, ही कथा आहे दोन वृद्ध व्यक्तिमत्वामधील विनोदी संघर्षाची, दोन भिन्न व्यक्तिमत्वाच्या व्यक्ति वृद्धाश्रमाच्या नियमांमुळे एकाच खोलीत राहायला लागतात, त्यामुळे त्यांच्या आयुष्यात होणार्या घडामोडींची ही एक विनोदी कहाणी.
या दोन व्यक्तिरेखांची(मोहन जोशी आणि मोहन आघाशे) गोष्ट एका तिसर्या व्यक्तिरेखेभवती फिरते ती म्हणजे मिसेस दामले(किशोरी शहाणे).
आणि सुरू होतो एका वेगळ्या प्रेमाचा त्रिकोण. चित्रपटात आणखी दोन प्रेम कथा आहेत, २० व्या वयातील मिसेस दामले यांची मुलगी आणि तिचा कॉलेज मधील प्रियकर आणि मध्यम वयातील डॉ पाटकर आणि जिम ट्रेनर .
मोहन जोशी, मोहन आघाशे आणि किशोरी शहाणे अश्या दिग्गज कलाकारांच्या अभिनयाने परिपूर्ण, एका हलक्या फुलक्या विनोदी चित्रपटाची मजा अनुभवायची असेल तर २९ मेला आपल्या जवळील चित्रपटगृहात नक्की पहा मोहन जोशी आणि मोहन आघाशे यांच्यातील तू तू में में … दोन भिन्न प्रवृत्तीच्या म्हातार्यांची एक गमतीदार गोष्ट..