Marathi Movie Review Asa Mee Ashi Tee – असा मी अशी ती चित्रपट परीक्षण
उषा सतीश साळवी निर्मित आणि अतुल काळे दिग्दर्शित असा मी अशी ती चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला.
नियती, किंवा नशीब असे शब्द आपण नेहमी वापरतो, नशिबात जे लिहलय तेच होणार असेही अनेकदा म्हणतो, पण काही जण असतात जे आपल्या नशिबाशी झगडतात आणि स्वताचे लक्ष्य साध्य करतात. अश्याच एका सिद्धार्थ ची ही कथा.
कथेचे वेगळेपण म्हणजे शंभू महादेव(भरत दाभोळकर) आणि त्यांची पंडितांची सेना, नियतीने एखाद्याच्या नशिबात लिहलेल्या घटना जशास तश्या घडतात की नाही यावर लक्ष्य ठेवणे हे यांचे काम.
सिद्धार्थ कामत(सचित पाटील) हा आर्किटेक्चर आहे मिहिर(अथर्व बेडेकर) हा त्याचा लहान मुलगा, सिद्धार्थची पत्नी रिया(मानसी साळवी) हिचा एका वर्षापूर्वीच कॅन्सर ने मृत्यु झालेला. अशी या चित्रपटाची पार्श्वभूमी. अश्यातच सिद्धार्थ च्या आयुष्यात अक्षरा(पल्लवी सुभाष) येते.
पण सिद्धार्थ आणि अक्षराचे एकत्र येणे हे त्यांच्या नशिबात लिहिलेले नसते, म्हणून शंभू महादेव आणि त्याची संपूर्ण सेना या दोघांनी भेटू नये यासाठी प्रयत्न करते, आणि सुरू होतो एका सामान्य माणसाचा त्याच्या नशिबाबरोबर लढा.
सिद्धार्थ आणि अक्षरा एकत्र येऊ नयेत म्हणून शंभू महादेव काय काय अडथळे आणणार? या सर्वातून सिद्धार्थ आणि अक्षरा एकत्र यावेत म्हणून कोण मदत करणार? सिद्धार्थ आपल्या नशिबाशी जिंकणार की नाही ?
अश्या अनेक प्रशंनांची उत्तरे आपणाला चित्रपटातून मिळतीलच…
सचित पाटील, मानसी साळवी आणि पल्लवी सुभाष यांचा अभिनय उत्तम. अथर्व बेडेकर याचा ही अभिनय विशेष…
चित्रपटातील मानसी साळवी आणि पल्लवी सुभाष दोन्ही अभिनेत्री सुंदर पण दिग्दर्शक त्यांची सुंदरता पडद्यावर दाखवण्यात अपयशी ठरतो. चिटपटाच्या सुरूवातीला सिद्धार्थच्या ऑफिसमध्ये अनेक पांढरे धोतर नेसलेले पंडित फिरताना दिसतात पण नंतर ते पुन्हा कुठेच तसे फिरताना आढळत नाहीत. चित्रपट अश्या अनेक तार्किक गोष्टींवर अपयशी ठरतो. चित्रपटाचा पहिल्या भागात सिद्धर्थच्या आयुष्यातील पूर्वार्ध दाखवण्यात आला, हा जरा जास्तच लांबवल्या सारखा भासतो आणि प्रेक्षकांना अधीकच इमोशनल करतो. अनेक अडथळ्यांना पार करत सिद्धार्थ आणि अक्षरा जेव्हा शंभू महादेवाच्या सामोरं समोर येतात तेव्हा अचानक चित्रपट संपतो आणि अनेक प्रश्न औत्तरीत ठेवून चित्रपट संपतो.
चित्रपटाचा प्लस पॉइंट म्हणजे चित्रपटातील गाणी, संगीत आणि चित्रपटातील संदेश, मनापासून प्रयत्न केला तर जे नशिबात नसेल ते ही मिळवता येत.