Marathi Article – एक तुझं मन…

0
2254

Marathi Article – एक तुझं मन…

Marathi-Article

कुठं आहेस? कसं आहेस ? कोण जाणे पण तू आहेस हे मात्र नक्की. कधी दिसलं नाहीस , कधी नुसत्या डोळ्यांनी ही पाहिलं नाही पण अंर्तकरणातून मात्र तू जाणवतेस म्हणजे तू नक्कीच आहेस. आज तुला शोधण्याचा खुप प्रयत्न करतोय पण काही केल्या सापडत नाहीस. जरा माझ्या मनातील भावना तुझ्या मनावर उमटवायच्या होत्या .

तुझ्या असण्याच्या आशेनेच तर मी जगायचो कारण तुझ्यातच उद्याची स्वप्नं पहायचो.ठरवलंय आज जरा तुझ्याशी बोलायचंय, दोन मनातील एक गुपीत ओठांवर उमलवाचंय. रागवू नकोस अजून बरंच काही सांगायचंय मला. इवलसं हे माझं मन फक्त तुझं झालं होतं. तुझ्या प्रत्येक गोष्टीत ते आपलं झालं होतं मग सांग का परकं केलंस मनाला माझ्या ? कीती यातना झाल्या असतील त्या बिचाऱ्याला?आज ही ते एकांतात असलं की, आठवण तुझीच काढतं. आठवणीत तुझ्या रडून मग शांत होतं. जरासा तरी विचार करायचा ना त्याचा. मला असं वाटायचं आपल्या दोन मनांचं मिलन प्रेम करण्यास पुरेसे आहे . पण नाही एक मन त्या प्रेमाच्या बाबतीत निरागस झालं . पण ते मन माझं की तुझं ते माञ कळेना झालं .माझं मन तर तुझंच झालं होतं. तुझ्या प्रत्येक गोष्टीत आपलं झालं होतं. मग सांग का खेळ खेळला त्या नाजूक मनाशी. इवलसं ते मन बिचारे किती कोमेजलेय बग आज. इतकं होऊनही फक्त तुझ्याच मनाचा विचार करतय. खरंच आज कळतंय मन वेडं का असतं. खुप प्रेम केलं होतं तुझ्यापेक्षा तुझ्या मनावर. कारण मला ते एक निर्मळ झ-याप्रमाणे वाटलं होतं आणि हेच मन मी नाही मिळवू शकलो याची खंत वाटेल माझ्या संपूर्ण आयुष्यात.
तुझं माझ्यावर असणारं प्रेम कदाचित कमी होईल पण माझ्या आयुष्यातील तुझी कमी कधीच पूर्ण होणार नाही. कारण इतकं मनापासून प्रेम केलय तुझ्यावर , तुझ्या हसण्यावर, तुझ्या रुसण्यावर, त्या लाजून बोलण्यावर. तू विसरली असलीस तरी मी रागवणार नाही तुझ्यावर. कारण माझ्या अस्तित्वात नसलेल्या गोष्टी मला देऊन गेली आहेस. त्यांच्या आठवणीत जगायला ही मला मस्त वाटतं. कारण आठवणी या फसव्या नसताजेत तर त्या चिरंतन काळ टिकणा-या असतात. कोणास ठाऊक या आठवणी तुझ्याही मनाला सतावतात की नाही ? मनाला माझ्या असे अनेक प्रश्न पडतात मग तुझ्याच आठवणीत उत्तरे ही त्यांना मिळतात. आणि तीही सांगतात मला अरे नाही विसरणार ती तुला.
आठवतं का तुला आपल्या प्रेमाच्या भेटीसाठी आपली दोन मनं किती आतूर झाली होती. आपल्या दोघांच्या मिठीत ती एक होण्याची वाट पाहत होती. आठवते का बग तेव्हाची ती रम्य संध्याकाळ , हातात हात देत तू कवेत माझ्या येत होतीस. तुझ्या त्या नाजूक हातांचा स्पर्श आजही मला आठवतो आणि अंगावर शहारे आणतो. निशब्द असे मन आपले शब्दरुपी होत होते कारण इवलेसे हदय आपले तारुण्यात येत होते. “ती पहीली भेट ” असं वाक्य जरी माझ्या ओठावर आलं ना तरी तो आपल्या आयुष्यातील कधीही न विसरता येणारा क्षण जसाच्या तसा डोळ्यासमोर येतो. मग त्या आठवणीत या मनाला मात्र खुप ञास होतो.
मला माहितीय मी आज खुप काही बोलतोय. पण आज बोलू दे गं माझ्या मनातील तुझ्यावर असणारं प्रेम व्यक्त करु दे. काही चुकलं तर अपराधी असेन गं तुझा पण एकदा परत या मनाला आपलं करुन बग ना. कारण एक मन आपलं करण्याचा प्रयत्नात मी कित्येक आपल्यांची मनं दुःखवलीत गं. कदाचित याचीच तर शिक्षा मिळत नाहीय ना या मनाला माझ्या. माझं हे मन तुला आपलं करता आलं नाही तरी राग नाही तुझ्यावर. पण विनंती आहे दुसरं कोणतं मन आपलं करण्याचा प्रयत्न माञ करु नकोस. नाहीतर खुप ञास होईल गं या मनाला माझ्या. कारण माझं मन हे मी तुझ्यावर कोणता खेळ किंवा तरुणाईची धुंदी समजून केलं नव्हतं तर ते निस्वार्थीपणे तुझ्यात गुंतवलं होतं आणि इतकं निस्वार्थीपणे मन गुंतवूनही तुझं प्रेम मला मिळालं नाही म्हणून मी नाराज नाहीय गं तुझ्यावर. तुला आयुष्यभर जपून ठेवेन या मनात अगदी सुकोमल फुलासारखं कधीही कोमेजू देणार नाही….

फक्त तुझंच असणारं एक माझं मन .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here