शब्द – Marathi Kavita

27
1271
Marathi Kavita Shabda

Marathi Kavita – Shabda – शब्द

कवयित्री – आर्या

शब्दांबरोबर खेळणं,आता जमायला लागलय मला 
शब्दच करतात सोबत,हे कळायला लागलाय मला 

कुणीच नसत बरोबर, तेंव्हा शब्द बिचारे साथ देतात 
शब्दांमध्ये गुंतवून ठेवून, एकटेपणावर मात देतात 

शब्दांची तऱ्हाच असते न्यारी,ते वळवावे तसे वळतात 
अर्थ ज्याचा त्याने शोधायचा,ते कळायचे त्यांना कळतात 

शब्दांना कशाची, जोड नाही लागत 
अंतरीचे भाव फक्त,ते बाकी काही नाही मागत 

शब्द असतो बोलका,असतो मनाचा आरसा 
मनाचं प्रतिबिंब डोळ्यात दाखवतो,खोट बोलत नाही फारसा 

शब्दांचं दुःख नेहमी, डोळेच डोळ्यातून गाळतात  
अश्रू लपवताना मात्र, शब्द बोलणं टाळतात 

बोलायचं खूप असत त्याना, पण कधी कधी मौन पाळतात  
शब्द असतात असेच वेडे ,ते आपला शब्द पाळतात 

…….. आर्या 

27 COMMENTS

  1. वा! आर्या,

    शब्दांची शब्दांनीच केलेली गुंफण एकदमच मस्त.

    कविवर्य मंगेश पाडगावकर म्हणतात तसे
    शब्द शब्द जपून ठेव बकुळीच्या फुलापरी.

    खूप खूप शुभेच्छा.

  2. शब्द हे खरे मित्र… चांगले वाईट सांगणारा मित्र !!!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here