Marathi Kavita – Tucha Sarvopari – तूच सर्वोपरी
कवी – अनिकेत काटे
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी
हे पांडुरंगा, हे विठ्ठला, हे श्रीकृष्णा,
आता तूच सर्वोपरी
नाव तुझे ओठांवरती,
विचार तुझे मनामधी,
हे पांडुरंगा तुझाच चरणी,
होतील सर्वे समाधानी।
तुझ्या नावातच रंग आहे,
काळ्या रंगाला ही तुझी साथ आहे,
पिवळे-पांढरे तर तुझे वस्त्र आहे,
आता तूच आमचा पांडुरंग आहे।
सर्वोपरी तुझे रूप आहे,
नाव येताच तुझे ओठी,
सर्वे निवासी सुख रूप आहे,
आता तूच आमचा पांडुरंग आहे।
रुक्मिणी ही तुझी, राधा ही तुझी च,
विठ्ठल ही तू आणि श्रीकृष्ण ही तू च,
नामस्मरण करताच तुझे,
येई पुढे सुंदर तुझे ते रूप।
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,
हे पांडुरंगा, हे विठ्ठला, हे श्रीकृष्णा,
आता तूच सर्वोपरी।
आता तूच सर्वोपरी।।
– स्वयं शब्द: अनिकेत काटे