Marathi Kavita – तुमचे आमचे

0
4463

Marathi Kavita – तुमचे आणि आमचे

: वैभव जोशी लिखित

Marathi-Boli-Kavita

तुमचे दु:ख जीवघेणे 
तुमची आसवे प्रांजळ 
आम्ही जन्माचे सोशिक 
आमची कोरडी ओंजळ 

तुम्ही कलंदर वृत्ती 
तुम्हां झूट नातीगोती 
तुमची लहर .. लहर 
आम्ही सहनशक्ती..कोती

तुमचा पाऊसही मोठा
तुमचा पैसाही न खोटा
तुमचे सृजन अस्सल
आमचा आक्रोश वांझोटा

तुमचे नाणे सोळा आणे
तुमचे कलदार गाणे
तुम्ही म्हणाल ती पूर्व
आम्ही पश्चिमेप्रमाणे..

तुमची बावनकशी खंत
तुमचा रागही जिवंत..
आग भिजे आवंढ्यात
आम्ही कसले ज्वलंत

तुम्ही व्यथांचा उरूस
जरी डोळां ना टिपूस
आम्ही जन्माचे सोशिक
आमचा खांदा.. तुमचा क्रूस !!!

**** वैभव जोशी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here