Marathi Article – हरवलेलं बालपण

0
2265

Marathi Article – हरवलेलं बालपण

Marathi Article
क्ष्वासांना आवरत,धापा टाकत एक एक जिन्हा मी शर्यतीने चडत होतो. एक ट्रेन चुकली म्हणजे येणारे पंचवीस मिनिटे रिकाम्या गाडी ची वाट पाहत बसा. पाऊल टाकतो न टाकतो तीच ट्रेन ने गती धरली आणि आपल्या मार्गास रवाना झाली. एखादा कोपरा पकडून मी निवांत उभा राहिलो. क्ष्वास अजून चड-उतारचा खेळ खेळत होते. स्वतभोवतीच फेर्‍या मारणार्‍या पंख्यामधून हलकीशी वार्‍याची झुळूक आली आणि वाफाळेल्या शरीराला आराम मिळाला. माझ्या भोवतीच एक चार एक वर्षाचा मुलगा हातात महागडा मोबाइल घेऊन होता. मोबाइल यंत्रणा आगधी चोकपणे हाताळत. एका फोलडर मध्ये जाऊन त्याने काही खेळ खेळयला सुरू केले. टेम्पल रनचा खेळ तो अचूक खेळत होता. नाजुकश्या रस्त्यातून माणसाला पळवताना त्याला खूप आनंदं मिळत होता. एकी कडे तो माणूस आपल्या वेगाने पळत होता आणि दुसरीकडे दोन रुळावरून आमची गाडी. त्याच्या कडे पाहिले आणि त्याच वेगाने मी पण लहानपणीच्या शर्यतीत हरवून गेलो. शर्यत स्वतः पळून पाहिले येण्याची, शर्यत लपंडाव खेळताना शोदून काडण्याची, शर्यत लगोरी लावण्याची, आनंद चिट्टी चोर पोलिस खेळताना चोर असल्याचा, मज्जा पावसात कागदी होडी बनवण्याची, जुनाट सायकल च्या चाका ला घेऊन काठी सोबत गाव भर हिंडण्याची, साप – शिडी मध्ये शिडी मिळण्याची, गम बूट घालून शाळेला जायची, कोर्‍या वहीचा तो सुगंधं, भिजलेल्या मातीचा वास,बॅटिंग साठी ते रडण,आणि असं बरच काही…..
आज कालच्या ह्या चिमुरड्यान्चा टॅब्लेट वरचा खेळ पाहिला की मन अगदी सुन्न होतं. मारिओ अँड सबवे सर्फ मध्ये अशे काही उड्या घालत आहेत की यांचं गोट्या खेळायचा राहूनच गेलं. सापाला चुकवत घरात पोचू कशे या पेक्षा डायमंड रश मध्ये डायमंड कशे मिळवतो या कडे जास्त कल असतो. गूगल आणि इंटरनेट च्या जाळ्यात सापडलेले ही मुलं स्वतभोवती एकटेपणाचा जग बनवून निवांत असतात आणि हळू हळू त्यांचं बालपण निसटून जातो आणि आपण करत बसतो ती निरागस्तेची अपेक्षा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here