Marathi Kavita – माणसं
मनाला गारवा देणारी
देवारयाच्या गाभार्यात पूजन्यालायक
माणसं मला भेटली होती.
कुंटुंबवात्सल्य जपणारी दूरचा असूनही
जवळ करणारी माणसं मला भेटली होती.
हितचिंतकासारखी माझी वाट बघणारी
परका असूनही जवळचा मानणारी
माणसं मला भेटली होती.
मनात असूनही त्यांच्याबद्दल बोलण्यास;
कधी बोललोच नाही अन मजबद्दल मात्र
विचारपूस करणारी माणसं मला भेटली होती.
Nice…!
thanks mds…