Marathi Natak “Gandhi Aadva Yeto” – गांधी आडवा येतो.
नुकतेच मराठी रंगभूमीवर पदार्पण केलेले हे मराठी नाटक “गांधी आडवा येतो”(Gandhi Aadva Yeto).
मुख्य कलाकार : उमेश कामत.
लेखक : शफाअत खान.
दिग्दर्शन : प्रियदर्शन जाधव.
नवा गाडी नव राज्य या नाटकं नंतर अथर्व निर्मित गांधी आडवा येतो हे उमेश चे दुसरे नाटक. या नाटकात उमेश ने लाल्याची म्हणजेच एका गुंडची भूमिका केली आहे… नेहमीच्या मुमिकण पेक्षा उमेश ची ही थोडी वेगळी भूमिका आहे…
नाटकतील लाल्या हा एक गुंड आहे, एक रस्त्यावरील मवाली आहे. हा लाल्या जेव्हा एका सूसंस्कृत घरात जातो, तेव्हा त्याला हवे असलेले संस्कार त्याला मिळतात का? याची ही गोष्ट आहे.
थोडक्यात सांगायचे तर लाल्याचा सूसंस्कृत बनण्याचा हा एक विनोदी प्रवास आहे.
कथा:
एक मध्यमवर्गीय कुटुंब आहे, ज्यात प्रोफेसर त्यांची बायको, त्यांना एक मुलगी जी एमबीबीएस आहे, धाकटा मुलगा जो अॅड एजन्सी मध्ये नोकरी शोधतोय.
या कुटुंबाची खोटे बोलू नये, खरेच बोलावे, अशी शिकवण, पण खरोखर असे वागता येते का?
अश्या सूसंस्कृत घरात लाल्या येतो,(लाल्याने प्रोफेसरांच्या मुलीशी लग्न केले आहे.) आता हा लाल्या या घरात आल्यावर जे काय होते….ते म्हणजे हे नाटक “गांधी आडवा येतो”
(Gandhi Aadva Yeto)गांधी आडवा येतो ???
याचे कारण आहे…गांधीजी ची अहिंसा वादी विचारसरणी..
जेव्हा नाटकातील लाल्याच्या प्रवासात ..ही गांधीजींची विचारसरणी अनेकदा आडवी येते…म्हणून गांधी आडवा येतो…
तर अथर्व निर्मित, शफाअत खान यांचे लेखन, प्रियदर्शन जाधव यांचे दिग्दर्शन आणि उमेश कामत यांचा अभिनय ….. अनुभवण्यासाठी नक्की पहा…
गांधी आडवा येतो(Gandhi Aadva Yeto),
swapanil u r growth is too fast…. this page is too good,, but I want watch online our marathi movies & natak ,,,,,,,? my best wishes always with uuuu,,