Marathi Kavita – सुरवात माझ्या लेखनाची…
नजरेसमोरील कोरे कागद
अधिकच काही खुणवत होते
मनातील भावं ही आजकाल
मनातच दाटत होते
मार्ग मिळाला भावनांना
आठवणींना आणि विचारांना
घेतली ‘लेखनी’ मग हाथी
उतरवण्यास कागदांवर त्यांना
थोडे जमले, थोडे चुकले
सुरुवात कशीबशी झाली
पण सुरुवात म्हणजेच ‘हाफ-डन’
ही म्हण मग ध्यानी आली
जसे उमगते, जसे आठवते
तसे आज लिहितो आहे
समोरील ‘ते’ कोरे-कागद
माझ्यापरी भरण्याचा प्रयत्न करीतो आहे.
– मिलिंद डोंबाळे (देशमुख)
SUNDER
धन्यवाद !!!
TUMCHYA KAVITA FAR UTTAM AAHET
KHUPCHA CHAN
KHUPCHA CHAN
farch chan kavita….