Marathi Movie Lokmanya Ek Yugpurush Review – लोकमान्य एक युगपुरुष चित्रपट परीक्षण

0
2341

Marathi Movie Lokmanya Ek Yugpurush Review – लोकमान्य एक युगपुरुष चित्रपट परीक्षण

lokmanya-ek-yugpurush-movie-review

ओम राऊत दिग्दर्शित लोकमान्य एक युगपुरुष हा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या आयुष्यावर आधारित पहिलाच चित्रपट २ जानेवारी २०१५ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाला.

बाल गंधर्व चित्रपटातील अप्रतिम अभिनयानंतर पुन्हा एकदा सुबोध भावे चा अप्रतिम अभिनय लोकमान्य या चित्रपटातून पाहावयास मिळतो.

“देशासाठी काहीतरी करूया या विधानावर लोक एखादा सरदारजीचा जोक सांगितल्या प्रमाणे हसतात” हे या चित्रपटातील विधान, लोकमान्य हा चित्रपट एक चरित्र चित्रपट नसून आजच्या काळाला लोकमान्यांच्या विचारांशी जोडणारा एक चित्रपट आहे.

चित्रपटात चिन्मय मांडलेकर यांनी आजच्या काळातील एका पत्रकाराची भूमिका केली आहे, तर प्रिया बापट हि चिन्मयच्या प्रियसीच्या भूमिकेत आहे.  दोघांचेही अभिनय उत्तम आहेत.

समीर विद्वान यांनी गोपाल गणेश आगरकर यांच्या भूमिकेला योग्य न्याय दिला आहे, लोकमान्य आणि आगरकर यांची मैत्री आणि विरोधी विचार या चित्रपटात अनुभवास येतात. प्रशांत उथळे यांनी दामोदर चाफेकर उत्तम साकारला आहे.

लोकमान्यांचे संवाद आजच्या काळातही तेवढेच लागू पडतात या वरुन चित्रपटाचे लोकमान्य एक युगपुरुष हे नाव योग्य वाटते.

चित्रपतील सर्वच संवाद उत्तम आहेत, उत्तम पार्श्व संगीत चित्रपटातील रंगत अधिकच वाढवते.

प्रत्येकाने एकदा पहायलाच हवा असा चित्रपट .. लोकमान्य एक युगपुरुष ..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here