Google Adsense
काय आहे हे Google Adsense ….?
आपल्या पैकी..बर्याच जणांना. … अजून हे माहित नाही….
आता Google सगळ्यांनाच माहित आहे…इन्टरनेट वर काहीही शोधायचे असेल तर सर्व प्रथम ज्याची आठवण येते ते गुगल..
तुम्ही गुगल चा वापर रोज..करता…तो ही अगदी मोफत..
कधी विचार केला…गुगल हे सगळे मोफत कसे उपलब्ध करून देते…
ही कंपनी चालते तरी कशी…
या वर नीट विचार केला तर लक्ष्यात येईल… ही कंपनी अगदी तशीच चालते …जसे आपल्या टीव्ही वरील Free To Air Channels ..
म्हणजेच Advertising वर..
तसेच ही गुगल कंपनी पण चालते Advertising वर..
आता याचा आणि आपल्या Google Adsense चा काय संबंध..
संबंध आहे…
गुगल वर आपण जेव्हा काहीही शोधतो..तेव्हा समोर येणाऱ्या पर्यांपैकी सर्वात वर येणारे २-३ पर्याय..हे खरे तर Advertise असतात …तुम्ही जेव्हा त्यावर क्लिक करता..तेव्हा गुगल कंपनीला त्याचा फायदा होतो..
असो..
आपण पुन्हा एकदा आपल्या मुख्य गोष्टी कडे येऊ..Google Adsense ..
गुगल ने Adsense ही सेवा ब्लोगलेखक, वेबसाईट डेव्हलपर साठी बनवली..
या सेवेतून गुगल ने ब्लोग लेखकांना त्यांच्या लिखाणातून उत्तपन्न कसे मिळवता येईल ते दाखवले..
थोडे गुंतागुंतीचे आहे ..पण सोपे आहे..
तुम्ही फक्त गुगल ची किंवा गुगलच्या माध्यमातून येणाऱ्या Advertise ला तुमच्या ब्लोगवर किंवा वेबसाईट वर जागा द्यायची..
जेव्हा कोणीही वाचक ..तुमच्या ब्लोगवर असलेल्या Advertise वर क्लिक करेल तेव्हा नक्कीच गुगलला त्यातून नफा होणार … मग गुगल त्या नफ्याचा काही भाग हा ब्लोग लेखकाला देणार..
असा साधा आणि सोपा फंडा आहे..
ही होती साधी रूपरेषा..पुढील भागात अधिक माहिती मिळवूया..
Glad I’ve finlaly found something I agree with!
एव्हडच माहिती आहे तर स्वतः च्या वेबसाईट का नाही चिकटवत ??
नमस्कार रत्नेश,
गूगल अडसेन्स मराठी भाषेला सपोर्ट नाही करत, त्यासाठी संकेतस्थळावर ६०% पेक्षा अधिक माहिती इंग्लिश भाषेत असावा लागतो.
माझ्या इतर अनेक संकेत स्थळांवर गूगल अडसेन्स वापरले आहे, आणि त्यातून चांगले उत्पन्न पण मिळते .. जसे marathiboli.com, technicalmafia.in
किती उत्पन्न होऊ शकते काही कल्पना दिली तर भारी काम होईल आपलं. मी सहा महिन्यांपासून मराठी ब्लॉग लिहित आहे मला वाटलं मराठीमाती सारखे पैसे कमवू , दर रोज अडीच हजार व्हिजीट मिळाल्या लागल्या मग म्हटलं आता AdSense लावून पैसे कमावण्याची हीच वेळ आहे.
पण नंतर कळाल माझ मराठीप्रेम उतू गेलं . AdSense ला लात मारावी तर दुसरा पर्याय नाही . मग म्हटलो वेबसाईट तयार करण्यात काहीच अर्थ नाही. आता गुपचूप इंग्लिश ब्लॉग परत चालू केला , सहा महिन्यांपूर्वी सुरु केला असता तर pocket money भेटला असता.
मी विश्लेषण केलं आहे की निम्मी वेबसाईट इंग्लिश मध्ये केली तर फक्त How to Loose Weight, Matrimoney ,Download Now, Ati Driver वगेरे ad मिळतात .
मी संपूर्ण मराठी वेबसाईट वर ६ महिन्यापासून काम करतो आहे. ब्लू प्रिंट रेडी आहे . जर मला नेमकी किती कमाई होती ह्याची कल्पना दिली तर मी एक इंग्लिश वेबसाईट काढून तो पैसा त्या मराठी वेबसाईट वर लावेन आणि लोकांसाठी फुकट चालू करेन मराठी विकीपेडिया पेक्षा भारी .
माझा उद्धट बोलण्याचा काही उद्देश नव्हता , पण ६ महिने काम करून थोडी चीड चीड झाली , त्याच्या बद्दल माफी मागतो.
तुमची एखादी इंग्लिश वेबसाइट जर अडसेन्स अपृव्हड असेल तर आपण तो कोड मराठी संकेतस्थळावर वापरू शकतो. आपले संकेतस्थळ हे जर पुर्णपणे कष्टमाइज असेल तर गूगल आपल्या संकेतस्थळावर चालेल. पण जर ब्लॉगर किंवा वर्डप्रेस असेल तर गूगल काही दिवसातच अॅड बंद करेल.
इंग्लिश संकेतस्थळ असेल तर आणि दिवसाला ३००० पेक्षा अधिक अमेरिकेतील वाचक असतील तर दिवसाला आपण ५ ते १० डॉलर कमवू शकता.
आणि गूगल अडसेन्स हा एकच पर्याय नाही आहे. आपण डायरेक्ट अॅडवरटाजिंग पण वापरू शकता. चेक बायसेलअड्स.कॉम(BUYSELLADDS.COM) तसेच इतर अनेक पर्याय आहेत.
गूगल गेल उडत ! मला फक्त मराठीच येत आता माझा काय दोष. आपण चार पाच वेबसाइट मिळून स्वत:ची अॅड एजन्सि टाकू. मी नाशिकचा आहे – नाशिक, पुणे , मुंबई , औरंगाबाद जिथून मराठी वेबसाइट जास्त बघितल्या जातात तेथून लोकल अॅड गोळा करू मी नाशिकच्या अॅड तुम्हाला देईल आणि तुमच्या कडच्या तुम्ही मला द्या. अशा प्रकारे चारपाच जिल्ह्यातल्या पेपर वाल्यांच्या अॅड पळवून एक सेंट्रल पॉइंटला आणून आणि ग्रुपमध्ये शेअर करू , काय वाटतं – नवीन आहे पण करून बघायला काय जातं ? मी तुम्हाला एक ईमेल पाठवतो त्यात माझे कॉनटॅक्ट असतील जर तुम्हाला याच्यात थोडं देखील पोटेंशीयल वाटलं तर प्लीज कॉनटॅक्ट करा . माझा ईमेल तुम्हाला लगेच येईल. त्याच्यात आइडिया डिसकस करू .
please contact me
Hi Somesh.
english site sathi google approve jhala asel tari te marathi sathi vaapartaa yet naahi….tyanna samajala ki te ads block kartaat…..
Marathi madhye blog lihun adsense hava asel tar tyanni marathi swikare paryant thambane haa ekach option aahe bhavanno…..sgla karun bsloy….ata tumhi tumcha vel naka ghalavu….[mala ek doubt aahe….atta me marathi lihitoy pn english spellings aahet…..asha blogs na milel ka adsense approval? me asa ek hindi blog paahilaa hota…]
contact me rohit.jadhav3636@gmail.com
ratnesh swapnil somesh plz contact me….mla pn same problem aahe….aapn discuss karu….
rohit.jadhav3636@gmail.com
नमस्कार रोहित,
गुगल अद्सेंस हे मराठी भाषेला सध्या तरी सपोर्ट करत नाही, तरी सुद्धा तुम्हाला महाराष्ट्र टाइम्स किंवा लोकसत्ता किंवा इतर अनेक मराठी संकेतस्थळांवर अड्सेंस दिसेल, यासाठी तुम्ही तुमचे संकेतस्थळ कसे बनवले आहे, आणि त्यावर नक्की किती लोक दररोज भेट देतात हे बघितले जाते.
वर्डप्रेस किंवा ब्लोगर अश्या CMS मधून गुगल चे रोबॉट तुमच्या संकेतस्थळाची भाषा लगेजच ओळखतात, पण जर तुमचे संकेतस्थळ अश्या कोणत्याही CMS मध्ये नसेल आणि त्यात ENGLISH भाषेमध्ये हिडन कोड टाकण्याची सुविधा असेल तर, त्यावर अड्सेंस दिसू शकते.
आणि सर्वात शेवटी अद्सेंस हाच पर्याय नाही… 🙂