Zhala Bobhata Marathi Movie Review – झाला बोभाटा मराठी चित्रपट परीक्षण

0
5657

Zhala Bobhata Marathi Movie Review – झाला बोभाटा मराठी चित्रपट परीक्षण

Zala-Bobhata-Marathi-Movie

  • निर्माता : साईनाथ राजाध्यक्ष , महेंद्रनाथ
  • दिग्दर्शक : अनुप जगदाळे
  • कलाकार  : दिलीप प्रभावळकर, भाऊ कदम, संजय खापरे, कमलेश सावंत, तेज देवकर, मयुरेश पेम, मोनालिसा बांगल
  • कथा  : अनुप जगदाळे

ग्रामीण कथेवर आधारित अनेक मराठी चित्रपट गेल्या २-३ वर्षात मराठी प्रेक्षकांच्या भेटीला आले, झाला बोभाटा हा देखील याच पट्टीतला एक सिनेमा.

अनुप जगदाळे लिखित झाला बोभाटा हा चित्रपट भाऊ कदम, संजय खापरे आणि कमलेश सावंत या मुख्य कलाकारां भोवती फिरतो. एका आदर्श गावात एक घटना घडते आणि संपूर्ण गावभर तिचा बोभाटा होतो, अर्थात हा  बोभाटा अप्पा म्हणजेच दिलीप प्रभावळकर यांच्या मुळेच सुरु होतो. या बोभाट्यामुळे गावामध्ये एक शोध सुरु होतो आणि त्यानून अनेक गमतीजमती होतात, ज्या प्रेक्षकांना हसायला लावतात.

चित्रपटामध्ये मयुरेश पेम आणि मोनालिसा बागल ही जोडी आहे, पण हे हिरो हिरोईन फक्त नावापुरतेच, त्याचे पैंजण हे स्लोमोशन गाणे देखील आहे, हे गाणे आपल्याला मराठीतील एका सुपरहिट चित्रपटाची आठवण करून देते, या सुपरहिट मराठी चित्रपटाचे नाव तुम्ही ओळखा आणि खाली कॉमेंट मध्ये द्या.

आता गावाकडील कथेवर आधारित विनोदी चित्रपट म्हटला म्हणजे त्यात काही कमरेखालील विनोद असणारच हे गृहीतच असते , तरी झाला बोभाटा मधील विनोदाची पातळी तशी बरी आहे, मध्यंतरा पूर्वीचा भाग प्रेक्षकांना पोट धरून हसायला नक्कीच लावतो. दिलीप प्रभावळकर यांच्या भूमिकेला चित्रपटात अभिनयाचा तेवढा वाव नाही, पण जो काय अभिनय आणि संवाद त्यांच्या वाट्याला आलेत, ते त्यांनी उत्तम केलेत. अप्पा हे चित्रपटातील मुख्य पात्र नसले तरी बोभाट्याचे मुख्य कारण नक्कीच आहे. कमलेश सावंत यांनी गावाच्या सरपंचाची भूमिका केली आहे. संजय खापरे यांचा अभिनय उत्तम मध्यंतरा पूर्वी संजय खापरे प्रेक्षकांना हसवून सोडतात . भाऊ कदम म्हणजेच विनोदाचा बादशहा सुद्धा या चित्रपटात आहे, पण भाऊ कदम यांना स्क्रीन वर बघून प्रेक्षक पोटधरून हसतील हा समज बहुतेक दिग्दर्शकाचा झालेला दिसतोय. मयुरेश आणि मोनालिसा या नवोदित जोडीचा अभिनय उत्तम.

चित्रपट तांत्रिक बाबींमध्ये नक्कीच उत्कृष्ट ठरतो, उत्कृष्ट संकलन, छाया यामुळे इतर विनोदी चित्रपटांपेक्षा झाला बोभाटा वरचढ ठरतो.

एकूणच खूप कंटाळा आलाय आणि डोक्याला अजिबात त्रास नकोय आणि फक्त हसायचे आहे तर हा चित्रपट आपण नक्कीच पाहू शकता.

झाला बोभाटा मराठी चित्रपटाचा ट्रेलर – Zhala Bobhata Marathi Movie Trailer

Don’t search torrent to download Marathi comedy movie “Zala Bobhata”, watch Marathi movie “zala bobhata” only in Theaters near you.

Say NO to Piracy

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here