Tuhya Dharma Koncha Review – तूहया धर्म कोंचा

0
790

Tuhya Dharma Koncha Review – तूहया धर्म कोंचा

सतीश मन्वर यांचा तूहया धर्म कोंचा हा चित्रपट शुक्रवारी प्रदशीत झाला.
नावाप्रमाणेच चित्रपट हा वेगळा आहे, तूहया धर्म कोंचा, चित्रपट आदिवासी समाजाच्या जीवनावर आधारित आहे .

tuhya dharma koncha

ही गोष्ट आहे कवडू (उपेंद्र लिमये) आणि त्याची बायको भुलाबाई(विभावरी देशपांडे) यांची.

कवडू आणि भुलाबाई आपल्या दोन मुलांसोबत महाराष्ट्रातील अभयारण्या जवळील जंगलात राहणारे आदिवासी कुटुंब. दिग्दर्शकांनी अहिराणी भाषेचा वापर करून प्रभाव पडला आहे . भाषा वेगळी असून देखील ती ओढून ताणून आणल्या सारखी वाटत नाही.

एके दिवशी अचानक कवडू ला वाघाच्या शिकारीच्या आरोपावरून वनरक्षक पकडून नेतात, घरातील करत्या पुरुषाला पकडून नेल्यामुळे भुलाबाई वर घराची जबाबदारी येते.

आणि चित्रपटाचे कथानक वेग घेते, सुखी जगण्यासाठी भुलाबाई फादर(किशोर कदम) च्या सांगण्याप्रमाणे कुटूंबासमवेत ख्रिश्चन धर्म स्वीकारते .

पण ख्रिश्चन धर्म स्वीकारून, आदिवासी कुटुंब खरेच सुखी होते?

त्यांच्या धर्मातराला हिंदू धर्मीय विरोध करतात ?

जगणे मोठे की धर्म ?

अश्या अनेक प्रशंनांची उत्तरे मिळवण्यासाठी तूहया धर्म कोंचा ..चित्रपट नक्की पहा.

गाभ्रिचा पाऊस या चित्रपटांनंतरचा सतीश मन्वर यांचा एक उतक्रुष्ट चित्रपट,

उपेंद्र लिमये आणि विभावरी देशपांडे यांचा अप्रतिम अभिनय.

किशोर कदम यांनी सकारलेले फादर तर सुहास पळशीकर यांनी सकारलेले गुरुदेव दोघे ही आपल्या ध्रम पद्धल आग्रही, पण दिग्दर्शकांनी कोणालाही निगेटिव भूमिकेत न दाखवता प्रभाव पाडला आहे.

आदिवासींचे जंगलातील वास्तव जीवन त्यांच्या आरोग्य विषयक व इतर समस्या दिग्दर्शकांनी रसिकांसमोर मांडल्या आहेत .

चित्रपट कुठेही डॉक्युमेंटरी वाटत नाही..

प्रत्येकाने पाहावा असा मराठी चित्रपट … तूहया धर्म कोंचा

[tube]nSmkzw71Cxo[/tube]

Tuhya Dharma Koncha.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here