तू दिसली नाहीस आज
झाले मन खिन्न खिन्न
पाहून हसली नाहीस आज
झाले काळीज छिन्न विछिन्न
नेहमीचेच सारे काही
तरी वाटे मज अनोळखी
का घुटमळे जीव इथे उगी उगी
बोलताना मित्रांसवे का वळूनी पुन्हा बघी
येशील आत्ता नि भेटशील
देशील हात माझ्या हाती
नेशील दुनियेत चंदेरी
घेशील मखमली बाहुपाशी
सांगतोय नाव तुझेच
फलक हृदयातला
देई मज आनंद
एक झलक जगण्यातला .