Marathi Movie Gulabi – गुलाबी
जिद्धी, बिच्छू, बिग ब्रदर असे हिन्दी चित्रपट दिग्दर्शित केलेल्या गुड्डू धानोआ यांचा मराठी चित्रपट गुलाबी.
निर्मिती : संतोष धानोआ, अनिकेत कर्णिक, रेणुका कर्णिक
दिग्दर्शन: गुड्डू धानोआ
कलाकार: सचिन खेडेकर (एसीपी अर्जुन), पाखी हेगडे(बार डान्सर गुलाबी),विनीत शर्मा, विनय आपटे, काजल वशिष्ट.
संगीत : दिलीप सेन आणि संतोक सिघ धालीवाल
प्रदर्शनाची तारीख : १८ जुलै
कथा :
गुलाबी हा मराठी सिनेमा, डान्स बार , बारमधील डान्सर्स, तसेच डान्सबार बंदीचा समाजावरील परिणाम यावर भाष्य करणारा आहे.
डान्सबार बंदी या विषयाशी निगडीत विविध पैलुंवर प्रकाश टाकणारा गुलाबी हा मराठी सिनेमा १८ जुलै २०१४ ला प्रदर्शित होत आहे, या सिनेमात एसीपी अर्जुन म्हणजे सचिन खेडेकर आणि बार डान्सर गुलाबी म्हणजे पाखी हेगडे यांच्यातील जुगलबंदी ड्यूटी विरुद्ध ब्युटी रसिकांना पाहण्यास मिळेल.
शिवाजी राजे भोसले, काकस्पर्श, आजचा दिवस माझा या सारखे अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांनंतर सचिन खेडेकर यांचा अभिनय पाहायचा असेल तर नक्की पहा, एका सामाजिक विषयावर भाष्य करणारा मराठी चित्रपट गुलाबी १८ जुलै २०१४ रोजी आपल्या जवळील चित्रपटगृहात.
[tube]YCy54omI-Js[/tube]
सवलतीच्या दरात मराठी पुस्तके विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा.