Premsutra Marathi Movie Review – मराठी चित्रपट प्रेमसूत्र
अजिंक्य चित्रपटानंतर दिग्दर्शक तेजस देओसकर आणि संदीप कुलकर्णी एकत्र येत आहेत प्रेमसुत्र या चित्रपटामध्ये
प्रेमसूत्र हा चित्रपट म्हणजे गोष्ट आहे शहरी प्रेमाची, किंवा प्रेमाच्या नव्या व्याक्ख्येची ,
काय असते हे प्रेम , आकर्षण ?? की मौज??.
गोष्टीचा नायक आहे आनंद, हा आनंद(संदीप कुलकर्णी) म्हणजे लग्नाला सिरियसली न घेणारा कॉर्पोरेट जगतातील महत्वाकांक्षी मध्यम वयीन युवक,
तर नायिका आहे सायली, गोव्याच्या कॅथलिक कुटुंबातील सायली (पल्लवी सुभाष).
चित्रपटाचा नायक , आनंद कामा निमित्त गोव्यात येतो, आणि एका पार्टीमध्ये सायलीला भेटतो, सायलीच्या मोकळ्या स्वभावाने लग्नाचा किंवा प्रेमाचा विचार पण न करणारा आनंद आकर्षित होतो. सायलीचा मोकळा स्वभाव आणि आनंद चे आकर्षण त्यांना वन नाइट स्टँड पर्यन्त पोचवते.
पण या वन नाइट स्टँड मुळे सायली प्रेग्नंट होते. आणि लग्नाचा विचार पण न करणारा आनंद लगेजच लग्नाला तयार होतो. दोघांचे लग्न पण होते.
इथ पर्यन्त गोष्ट एकदम सरळ प्रेम स्टोरी वाटते.
पण ही गोष्ट चालू असतानाच या गोष्टीत अजून दोन भूमिका आहेत .
आनंद च्या बॉस ची मुलगी मालविका(श्रुति मराठे) आणि आनंद चा सहकारी आणि मित्र सुजीत(लिकेश गुप्ते).
मालविका ला आनंद खूप आवडत असतो. आणि तिचे हे आकर्षण आनंद आणि सायलीच्या लग्नानंतर आणखीनच वाढते. आनंद ला जळवण्यासाठी मालविका आनंद चा मित्र असलेल्या सुजीतशी लग्न करते.
पण तिचा हा डाव फसतो.
पण मधेच काही कारणांमुळे आनंद आणि सायली मध्ये भांडण होते, याचा फायदा मालविका घेते, आणि सुजीत शी घटस्फोट घेऊन आणि आनंद ला नोकरीत बढती देऊन आनंदशी जवळीक साधते.
पण शेवटी कोणाच्या प्रेमाचा विजय होतो? आकर्षणाचा?? मौज मजेचा?? की प्रेमाचा??
हे पहाण्यासाठी प्रेमसुत्र चित्रपटगृहात जाऊन पहाच..
[tube]3xNT1mAPNWI[/tube]
[tube]G4VqlETjIFc[/tube]
चित्रपट तांत्रिकदृष्ट्या एकदम उत्तम. चित्रपटासाठी निवडलेल्या लोकेशन्स पण मस्तच, सर्व कलाकारांचा अभिनय उत्तम, पल्लवी चित्रपटात छान दिसते तर श्रुति मराठेची निगेटिव भूमिका उत्तम.
चित्रपटातील काही घटना नाटकी वाटतात.
चित्रपटात दोनच गाणी, पण दोन्हीही उत्तम आणि परिस्थितीनुरूप.
तेजस देऊसकर यांचा प्रेमसुत्र नक्की पहा.