Yere Yere Paisa Marathi Natak – मराठी नाटक येरे येरे पैसा

0
1723

Yere Yere Paisa Marathi Natak – मराठी नाटक येरे येरे पैसा

yere-yere-paisa-marathi-nat

निर्माता : मोहन दामले
लेखक : संजय मोने
दिग्दर्शक: अंकुर काकटकर
कलाकार : अभिजीत खांडकेकर , शेखर फडके, तेजस्विनी पंडित  & सायली मराठे
नेपथ्य : सुमित पाटील
संगीत : नीलेश मोहारीर
गायक  : स्वप्नील बांदोडकर,  माधुरी करमरकर, विद्या कलगीकर, डॉ नेहा राजपाल, अमृता काळे, जयदीप,  योगिता चितळे , मंदार आपटे , जानवी प्रभू अरोरा, स्वराली मराठे, श्रीरंग भावे, धवल चांदवडकर ,  यशोधा  आणि अभिजीत खांडकेकर .

येरे येरे पैसा हे नाटक म्हणजे आदित्य आणि रावी या एका महत्वाकांक्षी जोडप्याची संगीतमय कथा आहे. या दोघांनाही काहीतरी करून दाखवायचे आहे, पण याच नादामध्ये ते कायकाय गमावून बसतात याची ही कथा.

अभिजीत खांडकेकर यांचे हे पहिलेच नाटक, अनेक मराठी सिनेमा आणि मालिकांनंतर अभितीत प्रथमच रंगभूमीवर रसिकांचे मनोरंजन करण्यास येत आहे, तर त्याला साथ देत आहे तेजस्विनी पंडित, नाटकाच्या सुरूवातीला ही भूमिका अमृता खानविलकर साकारणार होती मात्र काही अडचणींमुळे तिने नाटकातून माघार घेतली.

हे नाटक म्हणजे एक ७०एमएम सिनेमाच आहे यात तब्बल १० गाणी आहेत, तर उत्कृष्ट नेपथ्य आहे .

अभिजीत खांडकेकर, शेखर फडके, तेजस्विनी पंडित, सायली मराठे यांच्या अभिनयाने साकारलेले आणि स्वप्नील बांदोडकर, जानवी प्रभू अरोरा, डॉ नेहा राजपाल यांच्या तसेच इतर गायकांच्या आवाजाने नटलेले येरे येरे पैसा हे संगीतमय नाटक नक्की पहा .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here