जात जात जात .. – Marathi Kavita Jat Jat Jat

0
2582

Marathi-Kavita-Jaat-Kaat-Jaat

कवयित्री – मेघा सुरेश भांडारकर
संपर्क – sankrantini@gmail.com

जात जात जात .. – Marathi Kavita Jat Jat Jat

जात , जात , जात
जो तो विचारी जात
कुठून आली जात ?
कुठून आली जात ? ॥

जन्म घेतला जेव्हा
ठप्पा नव्हता जातीचा ,
मी आहे अपुल्या मातीचा
फक्त अपुल्या मातीचा ॥

जातीसाठी लढलो मी
माणूसपण हो विसरून मी
आधी जात की माणूस आधी ?
विचार करीत बसलो मी ॥

माणसासारखा माणूस असुनी
दिसतो कां रे वेगळा ?
जातीवरुनी याला ओळखा
तुम्ही कां रे म्हणता ॥

माणसा सारखा माणूस मी
धर्म माझा मानवता
राष्ट्रासाठी जागे व्हा
विसरून अपुली जात ॥

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here