Prashant Damale not out 10,700 – प्रशांत दामले…..
प्रशांत दामले…..
प्रशांत दामले म्हणजे मराठी रंगभूमीवरचा सचिन तेंडूलकर…
ज्याने अनेकांचे रंगभूमीवरील विक्रम मोडून….स्वताचे विक्रम बनवले…अगदी एका दिवसात अनेक प्रयोगकरण्या पासून ते जगातील सर्वाधिक प्रयोग करण्यापर्यंत…
नुकताच प्रशांत दामले यांनी..रंगभूमीवर १०७०० प्रयोग करण्याचा जागतिक विक्रम केला…
प्रशांत दामले नावाचे गोंडस शब्द जेवढे गोड वाटतात त्याही पेक्षा त्याचा गोंडस अभिनय, मिश्किल स्वभाव आणि रंगभूमीवर नवनवीन संकल्पना घेऊन ठाम पणे उभा राहण्याचा त्याचा इरादा..
सार काही थक्क करून सोडणार..
डॉ.काशिनाथ घाणेकर यांच्या नंतर मराठी रंगभूमीवर रसिकांनी ज्यावर भरभरून प्रेम केले असेल ते प्रशांत दामले यांच्यावर…
गेली ३० वर्ष प्रशांत दामले यांनी रंगभूमीवर २७ नाटकांमध्ये भूमिका केल्या.. जपानी कलाकाराने केलेला १०२०० प्रयोगांचा विक्रम मोडून प्रशांत दामलेनी..गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स मध्ये नाव नोंदवले …
एक गोंडस, देखणा , प्रसन्न,मिस्किल स्वभाव , गाण्याचे उत्तम अंग , व्यवसायाचे चांगले भान असलेला प्रशांत म्हणजे प्रशांतच…
क्रिकेटच्या मैदानात जसा सुनील गावस्कर किंवा सचिन तेंडूलकर तसाच प्रशांत नॉट आउट १०७०० , नाबाद १०७०० प्रयोगांबद्धल प्रशांत दामलेंचे कौतुक करण्यास शब्दच अपुरे पडतात ..
प्रशांत दामलेंच्या ‘साईट ‘ वरील रसिकांचा विक्रम, प्रयोगांचा विक्रम, फ्यान क्लबचा विक्रम, प्रयोगातील भूमिकांचा विक्रम, अभिनेता म्हणून विक्रम, निर्माता म्हणूनही विक्रम, जाहिरातींचा विक्रम, अशा त्यांच्या विक्रमांवर एखादा विक्रमी महाग्रंथ नक्कीच होईल…
तूर्त प्रशांत दामलेंच्या रंगभूमीवरील नाबाद १०,७०० धावांबद्धल अभिनंदन…!