PPF Account – पीपीएफ उघडा प्राप्तीकर वाचवा

0
10348

PPF Account – पीपीएफ उघडा प्राप्तीकर वाचवा..

PPF-rules
PPF
प्रत्येकाचे पीपीएफ खाते असायलाच हवे..असे मला तरी वाटते..
पीपीएफ म्हणजे गुंतवणूक करून प्राप्तीकर वाचवण्याचा सर्वोत्तम मार्ग..पीपीएफ मध्ये दर वर्षी ७०,००० पर्यंत गुंतवणूक करता येते.
पीपीएफ मध्ये केलेली गुंतवणूक ही 80C मध्ये येत असल्याने त्यावर कर सवलत मिळते.
आता तुम्ही म्हणाल तुमचे १ लाखाची गुंतवणूक आधीच झाली आहे..
तरी देखील पीपीएफ मध्ये गुंतवणूक करण्यास काहीच हरकत नाही..
पीपीएफ मध्ये दरवर्षी कमीत कमी ५०० ते जास्तीत जास्त ७०,००० एवढी रक्कम भरता येते. पीपीएफ हे १५ वर्षान साठीचे खाते आहे, यात कमीत कमी १५ सलग वर्षे गुंतवणूक करावी लागते.
त्यामुळेच अनेकांचा कल हा NSC म्हणजेच National saving certificate कडे दिसतो .पण यामुळेच अनेक जण पीपीएफ च्या फायद्यांना मुकतात.
पीपीएफ वर चक्रव्याड व्याज मिळते, तसेच पीपीएफ मध्ये आपण ५०० ते ७०,००० मधील कितीही रक्कम टाकू शकतो वर्षातून जास्तीतजास्त १२ वेळा…आपण महिन्याला ४२ रुपये भरून सुद्धा हे खाते चालू ठेऊ शकता.
पीपीएफ मध्ये अजून एक गुपित दडलेले आहे..
पिपिएफ हे आर्थिक वर्षावर आधारित आहे..
म्हणून जर आपण हे खाते अगदी ३१ मार्च ला जरी काढले तरी त्याला येणाऱ्या १ एप्रिल ला म्हणजेच एका दिवसांनी १ वर्ष पूर्ण होते..
आणि तुम्हाला पुढील फक्त १४ वर्षेच खाते चालवावे लागते..
यात दर वर्षी किमान ५०० रुपये भरून शेवटच्या ४-५ वर्षात कमाल रक्कम भरून जास्त फायद मिळवता येतो..
आता तुम्हाला प्रश्न पडल असेल की …जर मधेच पैशांची गरज पडली तर…
तरी देखील मार्ग आहे..आपण पीपीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेवर कर्ज घेऊ शकता ..किंवा ६ वर्षान नंतर आपण काही प्रमाणात पैसे काढून घेऊ शकतो..
तर विचार करू नका…पीपीएफ मध्ये गुंतवणूक करा आणि काळजी सोडा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here