Marathi Kavita – Thamb Tu – थांब तू…
तू माझ्यात आहे
मी तुझ्यात आहे
याच ओळींची आज
मला साथ आहे…
आज अश्रू या डोळ्यांमधे
मनात ही शांतता आहे
गारठा नसून ही
आज ही कपकपत आहे
फक्त एका क्षणासाठी
थांब तू…
वर्गातला तो बाकडा
शाळेचा तो समोरचा वर्ग आणि
त्या आठवणीतली ती शाळा
हसू तर येत, पण
ते क्षण पुन्हा नयेत
म्हणून म्हणतोय थांब तू…
चुकलेत हृदयाचे ठोके तेव्हा,
नाही थांबलीस तू तर
आज ते बंद होतील,
या ठोक्यांसाठी तरी
थांब तू…
-स्वयं शब्द: अनिकेत काटे
[…] http://marathiboli.in/marathi-kavita-53/ […]