Marathi Movie Navra maza bhavra – नवरा माझा भवरा मराठी चित्रपट
गोवर्धन चंगो भगत निर्मित आणि कमलाकर गुंजाळ दिग्दर्शित नवरा माझा भवरा हा विनोदी चित्रपट येत्या शुक्रवारी म्हणजेच २९ मार्च २०१३ रोजी प्रदर्शित होतोय.
नवरा माझा भवरा चित्रपटामध्ये निखिल साबळे यांनी मुख्य भूमिका केली आहे, चित्रपटात निखिल साबळे बरोबर तमन्ना नायर ही अभिनेत्री मराठीत पदार्पण करीत आहे. चित्रपटात विनोदी भूमिकेत नावाजलेले अनेक कलाकार एकत्र प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
चित्रपटात सतीश तारे, भूषण कडू, विजू खोटे, विजय चव्हाण, प्रदीप पटवर्धन, हेमलता बाणे, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर या कलाकारांच्या भूमिका आहेत.
काही हिन्दी चित्रपटांमध्ये अनेक कलाकारांना एकत्र आणून केलेल्या गाण्यांनी धमाल उडवली होती, तसेच एक गाणे या चित्रपटामध्ये आहे, या गाण्यामधे मराठी सिंनेसृष्टीतील मराठी तारका एकत्र आल्या आहेत. या गाण्यामध्ये , सोनाली खरे, शर्मिष्ठा राऊत, मृण्मयी देशपांडे, भार्गवी चिरमुले, पूजा सावंत, मेघा घाडगे, गिरीजा ओक, आदिती सारंगधर, शर्मिला शिंदे, माधवी निमकर या तारका प्रेक्षकांचे मनोरंजन करणार आहेत.
चित्रपटाची कथा-पटकथा-संवाद आणि गीतलेखन राजेश बामुगडे यांनी केले असून संगीत अशोक वायंगणकर यांनी दिले आहे. नवरा माझा भवरा च्या गाण्यांमधे अवधूत गुप्ते, आनंद शिंदे, वैशाली माडे, स्वप्नील बांदोडकर यांचा आवाज ऐकण्यास मिळणार आहे.
बाबुराव पवार(निखिल साबळे) या पत्रकाराच्या आयुष्यावर चित्रपटाची गोष्ट फिरते .. नोकरी निमित्त मुंबईत आलेला बाबू कामिनी नामक स्त्री कडे पेईंग गेस्ट म्हणून राहतो.
एके दिवशी कामिनी बाबूशी जवळीक करण्याचा प्रयत्न करते , त्याची विडियो क्लिप पण बनते.
पण या क्लिप मुळे बदनामी होते ती बाबूची..
अश्या परिस्थितीत अडकलेल्या बाबूचे वडील कर्जाच्या ओझ्या पायी त्याचे लग्न ऐश्वर्या या एका जाड्या मुलीशी लावून देतो.. अर्थातच बाबू तिचा बायको म्हणून स्वीकार करीत नाही .
काही दिवसातच बाबूच्या आयुष्यात प्रिया (सुंदर मॉडेल) येते…
पुढे बाबूचे काय होते हे पहाण्यासाठी आणि पोट धरून हसण्यासाठी चित्रपट नक्की पहा..
आपल्या जवळच्या चित्रपटगृहात .. शुक्रवारी २९ मार्च २०१३ रोजी….