Marathi Kavita – सजन माझा
सांज बाई
बुडुनी गेली
स्वयंपाक सारा
करुनी झाला
गेला कुठे
सजन माझा?
रोज येतो
नाही आला .
वाट पाहत
दारात उभी
कधी येतो?
चिंता कपाळी.
कुत्राही बाई
नाही झेपावला
निपचित दारात
पडून राहिला.
काळीज माझं
चिरू लागलं
काय केल्या
मन गळालं
कधी आला
कुठे कळालं
पदरात रडू
गेली झोपाई.
कुशीत शिरुनी
आसवे पुसली
जाग नाही
आली सकाळी …।