Marathi Kavita – आभाळातलं सोनं

2
34684

Marathi Kavita – आभाळातलं सोनं

marathi-kavita-aabhalatal-son

आभाळातलं सोनं
दे रे देवा आता
नको पाहू वाट
होईल माझा अंत.

मध्यानीचा सूर्य
मावळती आला
पाण्यासाठी दाहीदिशा
ओलांडून झाल्या.

संपून गेल्या
सगळ्या वाटा
थकून माझा
टेकला माथा .

तुला कशाशीच
नाही पर्वा-,
सकाळ संध्याकाळ
भ्रांत येगळीच आम्हा.

सगळीकडे गडद
दुष्काळी छाया
थांबव सारी
भटकंती आता.

फिरून फिरून
कंबरडे मोडले
प्यायचे दोन घोट
मिळेनासे झाले.

गावातील आड विहिरी
कोरडे झाले
घरट्यातील पक्षी
दूरदूर निघून गेले.

घारीसम नजर
दूरवर कश्यासाठी?
पायात भिंगरी
घोटभर पाण्यासाठी…

हा खेळ देवा
तुझाच आहे
आभाळातल्या सोन्याचं
घमशान वाजू दे रे.

थकून गेला
जीव माझा
हे बघ देवा
विश्रांतीच आता.

तोंडात पडणारे
हातातून जात होते
फुलू दे शेती मळे
शेतातलं सोनं थोडं हातात दे रे……..

पांडुरंग वाघमोडे,जत

2 COMMENTS

  1. Liked your “Aabhalatala Sona” poem.Beautifully written,very touchy poem.I have composed it musically.Please send your mobile no.on my email id so as to talk with you. Thanks and Regards.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here