How to write in Marathi Language on internet – इंटरनेटवर मराठी भाषेत कसे लिहावे.

9
4143

How to write in Marathi Language on internet – इंटरनेटवर मराठी भाषेत कसे लिहावे.

How to write in marathi language

नमस्कार मित्रांनो,

अनेक मित्रांच्या या प्रश्नाचे आज मी उत्तर देत आहे.

आपण सारेच सोशल नेटवर्किंग साइट्स वर दिवसातील थोडा वेळ तरी घालवतोच,  पण याच सोशल नेटवर्किंग साइट्सवर मराठी भाषेत आपले विचार व्यक्त करणे अनेकांना कठीण जाते. त्यावर पर्याय म्हणून अनेक जण मराठी वाक्य इंग्रजी भाषेत लिहितात. अगदी याच पद्धतीने दोन मराठी मित्र एकमेकांशी चॅटिंग सुद्धा करतात.

कारण १ . इंटरनेट वर मराठी कसे लिहिणार (इथे मराठी फॉन्ट वापरता येत नाही जसे आपण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये वापरतो).

कारण २. मराठी फॉन्ट मध्ये लिहिणे अनेकांना कठीण जाते. त्यात आपण ज्या फॉन्ट मध्ये लिहितो तोच फॉन्ट ज्याला आपण फाइल पाठवणार त्याच्याकडे देखील असणे गरजेचे आहे.

पण आज मी तुम्हाला एकदम सोपं मार्ग सांगणार आहे. त्या मार्गाने तुम्ही फक्त मायक्रोसॉफ्ट वर्ड मधेच नाही तर फेसबूक, ट्वीटर किंवा अगदी जुन्या ऑर्कूट वर सुद्धा मराठी भाषेत लिहू शकता, जीमेल किंवा जीटॉक वर सुद्धा मराठी भाषेत चॅटिंग करू शकता. तेही अगदी जसे आधी तुम्ही मराठी वाक्य इंग्रजी भाषेत लिहीत होतात ना तसेच.

जसे शुभ कार्याची सुरुवात गणेश पूजनाने होते तसेच इंटरनेट वरील माहिती ची सुरुवात गुगल पासून होते.

गुगल.कॉम या  संकेत स्थळावर जाऊन भाषाइंडिया (bhashaindia) टाइप करा .

www.bhashaindia.com/ilit/ हे संकेतस्थळ निवडा.

How to write in Marathi Language

 

खालील प्रमाणे संकेतस्थळ आपणास दिसेल, त्यावर मराठी टॅब वर टिचकी मारा(क्लिक करा). आता खालील INSTALL DESKTOP VERSION वर क्लिक करा।

How to write in Marathi Language

आता INSTALL NOW या खालील बटणावर क्लिक करा.

How to write in Marathi Language

 

आता पुन्हा एकदा CLICK HERE TO DOWNLOAD वर क्लिक करा. आपले डाऊनलोड सुरू होईल.

How to write in Marathi Language

 

आपल्या इंटरनेट च्या वेगा प्रमाणे यास 2 ते 5 मिनिटे लागू शकतात. ३.२६ एमबी ची marathi.exe नावाची फाइल आपल्या कम्प्युटरवर डाउनलोड झाली असेल.

आता अर्ध्यापेक्षा जास्त काम तर पूर्ण झाले. आता फक्त ही फाइल इंस्टॉल करायची.

फाइल वर क्लिक करून प्रोसेस सुरू करा, अगदी सोप्या पद्धतीने एका मिनिटाच्या आत आपण ही फाइल इंस्टॉल करु शकतो.

बस काम झाले.. आता तुम्ही तुमच्या कम्प्युटर मध्ये कोठेही मराठी भाषेत लिहू शकता.

सॉफ्टवेअर इंस्टॉल झाल्या नंतर.

आपल्या टास्क बार वर म्हणजेच जिथे विंडोज चे स्टार्ट बटन आहे त्याच बार वर उजव्या बाजूला EN असे नाव दिसेल.

how to write in marathi language

आता त्यावर सिंगल क्लिक करा आणि मराठी भाषा निवडा.

how to write in marathi language वरील प्रमाने MA म्हणजेच मराठी हे नाव दिसेल, आता आपण कोठेही मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्ये किंवा फेसबूक, ट्वीटर वर किंवा कोणत्याही संकेत स्थळावर मराठीत लिहू शकता , तेही जसे इंग्रजी मध्ये लिहितात तेवढ्याच सोप्या पद्धतीने.

खूपच सोपे आहे ना … मग लगेच प्रयत्न करा आणि मराठीतच लिहा.

काही अडचण असल्यास कमेन्ट मध्ये लीहा.

 

9 COMMENTS

 1. मित्रा एकदम मस्त लिंक दिल्या बद्दल मंडल आपले आभारी आहे.

 2. फारच छान लेख ! तांत्रिक माहिती असूनही अत्यंत साध्या सोप्या व सरळ भाषेत मांडणी केल्याने कुणालाही अगदी सहज समजेल.
  माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद सुद्धा !
  प्रमोद तांबे

 3. मराठीजना साठी मराठी बोली खूप मस्त -सुरेख धन्यवाद
  आपला आभारी -श्री -केदार

 4. माननीय प्रमोद भाऊ मी कॉम्पुटर मध्ये थोडा कचचा आहे परिपूर्ण नाही माझे वय ५० पिसीसमोर बसून हेल्प ऑप्शन परंतु इंग्लिश थोडे वाचता येते पण अर्थ कळत नाही इंग्लिश-मराठी दिश्नरी कोणती डोव्न्लोड करू ?
  मराठीत ई -मेल कसा पाठवावा ?
  धन्यवाद,

  • सर्वप्रथम वरील लेख पूर्ण वाचून सर्व स्टेप पूर्ण करा.. त्या नंतर आपण याच पद्धतीने जीमेल किंवा इतर कोणत्याही मैल मध्ये मराठीतून टाइप करू शकता.
   आणि इंग्लिश तो मराठीसाठी http://khandbahale.com/ हे संकेतस्थळ उत्तम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here