Marathiboli Competition 2016 – एक आठवण भिम बाबा तुमची…

0
2117

Marathiboli Competition 2016 – एक आठवण भिम बाबा तुमची…

babasaheb-ambedkar-kavita

आजही क्षणाक्षणाला येते
आठवण भीम बाबा तुमची
किर्ती तुमची पाहता या जगी
मान उंचावते आम्हा सा-यांची

जेव्हा झाला नव्हता जन्म
या भूमी भीम बाबा तुमचा
तेव्हा आम्हा लोकांवर
बोजा होता फक्त हाल अपेष्टांचा

बाबा जन्म घेऊनी या जगी
नवा इतिहास गेलात लिहूनी
महती ही विश्वातील तुमची
लिहावी वाटते सुवर्ण अक्षरांनी

शिक्षण घेतलं भीम बाबा तुम्ही
वर्गाच्या बाहेर बसूनी
किती हाल सहन केलेत आम्हासाठी
रस्त्याच्या दिव्याखाली अभ्यास करुनी

नव्हता या जगी आम्हा
माणूस म्हणून जगायला थारा
पण आज तुमच्या मुळेच बाबा
देश ओळखतोय आम्हा सारा

माणूस असूनही आम्हा
माणसाचं स्थान नव्हतं
उच्च -नीच्च तेच्या बंधनात
मन आमचं खचलं होतं

तुम्हीच तर बाबा सा-यांना
माणूसकी म्हणजे काय शिकवलंत
आणि या देशाचं संविधान लिहून
माणसाला माणूस म्हणून घडवलंत

आज पाहतोय आम्ही हे सारं जग
तुमचाच जयघोष करतंय
म्हणून तर बाबा गर्वानं आमचं
मन आज उंचावतंय

बाबा आमच्यासाठीच तुम्ही
खुलं केलंत चवदार तळं
काळाराम मंदिरात ही चालू केलंत t
गर्वानं आमचं येणं-जाणं

तुम्हीच तर केलात बुध्दांच्या
दया, क्षमा ,शांतीचा स्वीकार t
आणि यामुळेच आलाय बाबा
आमच्या ख-या जीवनाला आकार

कवी- कु. चंद्रसेन सिध्दार्थ जाधव .
मो. ८४२२०५४0३९

 

मराठीबोली स्पर्धा

मराठी कविता

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here