वेगवान वेदनादायी मृत्यू – Marathi Kavita Vegavan Vedana dayi Mrutyu

0
901


कवयित्री – रजनी कांबळे
संपर्क – rajanikambale20@gmail.com

वेगवान वेदनादायी मृत्यू – Marathi Kavita Vegavan Vedana dayi Mrutyu

परवा आमच्या गल्लीतला एक तरणाबांड पोरगा अपघातात मेलाय..
त्याच्या पालकांकडे बघताना ज्याच्या त्याचा जीव कमालीचा तुटलाय..!
गाडीचा वेग वाढवताना हा वाढीव वेग
आपल्याला मृत्यू च्या दारात पोहोचवतोय एवढी भान नसतं का?
त्या गाडी पळवणाऱ्या जीवाला??

घरी कुणी वाट बघतय याचं भानच सुटत का ?
सुसाट वेगाने गाडी हाकणाऱ्या त्या जीवाला??
कुणी गाडीच्या ठोकरीन मरतय आणि कुणी स्वतः गाडी ठोकून मरतय..
कुणी नशेत चूर होऊन पाण्यात बुडून मरतय
तर कुणी कुणाला बुडवून मारतय..
आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाचं मन मात्र
अशी तरणी पोर अकाली गेली म्हणून हळहळतय..

वेग वाढवून वेगाने या जगातूनच तुम्ही तुमचं अस्तिव नष्ट करताय..
पण तुमच्या मागे तुमची कमी जाणवणार तुमचं कुटुंब
तुमच्या आठवणीने क्षणोक्षणी मरतय..
जपा रे जपा लेकरांनो स्वतःला..
तुम्हला एवढं मोठं करून तुमच्याच चितेला अग्नी द्यायचं दुर्भाग्य
तुमच्या पालकांच्या नशिबी येतंय..
मित्र गेला तर चार दिवस चार चौकात
त्याच्या नावाची चार पोस्टर लावून
चार महिन्यांनी पुन्हा त्याच-त्याच कारणांनी पुन्हा
कुणाचं तरी तरणबांड लेकरू मरतय..!
आज आमच्या गल्लीत,
उद्या पलीकडच्या गल्लीत
जेव्हा असं जगणं सुरू व्हायच्या उंबरठ्यावर
कुणी जगणं सोडून मरत तेव्हा..
मन पुन्हा-पुन्हा सुन्न होतय..
मन पुन्हा-पुन्हा सुन्न होतय..!

विचार तर कराल न असा
#वेगवान_वेदनादायी_मृत्यू
आजचा तरुण खरंच स्वतः ओढून आणतोय का??

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here