Marathi Kavita – जगणेच राहून गेले…
अचानक तुझे जाणे आता छळू लागले
एकट्यात चांदणेही आता पोळू लागले
हूस्न की बाजार में किस्से हजार पाहीले
देवालाही येथे पदर पसरून लाचार पाहीले
जेथे विश्वासानेच विश्वासाचा घात केले
कुठे मागणार दाद, जेव्हा कुंपणानेच शेत खाले
तू नसतांनाही तुझे असणे मी शोधत गेलो
तुझा आठवणीत रडणे आता गजल झाले
खुले आम चोर चोरी करून फरार झाले
तो मी नव्हे? पुरावे देण्यातच सारे जीवन गेले
परत येशिल का? आरे झाले ते होऊन गेले
जगासेबत चालताना जगणेच राहून गेले