आईचे मन – Marathi Kavita Aaiche Man

0
1464

Marathi-Kavita-Aaiche-Man

कवि – द. कृ. भातखंडे
संपर्क – datta.bhatkhande@gmail.com

आईचे मन – Marathi Kavita Aaiche Man

मन माझे होई हळवे कातर
होता तुज परतण्यास उशीर
सारे काही असे तुझे वक्तशीर
म्हणूनच लागतसे जिवा घोर  ( १ )

व्यवहार तुझे सारे कांटेकोर
संवादात सदैव टीपेचा सूर
सोसेना कुणाचेच वागणे गैर
याच कारणे चिंता लागते थोर  ( २ )

हाताची बोटे नसतात सारखी
का करु पाहतोस त्याना सारखी?
उगाच चेतवतोस ज्वालामुखी                                                     नको करुस मज तुज पारखी ( ३ )

 

विनविले परोपरी कितीकदा
ज्याचा त्याचा असो स्वहिताचा धंदा
नको जगास शिकविण्याचा फंदा
न ऐकसी माझी विनवणी कदा ( ४ )

कशा कळाव्या तुज माझ्या वेदना
सोसल्याशिवाय प्रसवयातना
विनवणी हीच तुज गजानना
सुबुद्धि देई यास विलंबाविना  (५ )

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here