Marathi Motivational Story – Technology Does not Stop you – तंत्रज्ञान तुम्हाला थांबवु शकत नाही

0
1462

Marathi Motivational Story – Technology Does not Stop you – तंत्रज्ञान तुम्हाला थांबवु शकत नाही

मराठी-motivational

ही गोष्ट आहे १५-१६ वर्षां पूर्वीची अमेरिकेतील वॉशिंगटन शहरातील.

नुकतेच इंटरनेट संपूर्ण जगात पसरायला सुरुवात झालेली, भारतामध्ये सुद्धा अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये काही गावांमध्ये इंटरनेट पोहोचलेले, अनेकांना उत्सुखता होती इंटरनेट म्हणजे नक्की काय, यावर काय करता येऊ शकेल. इंटरनेट ची व्याख्या पण अनेकांना माहित नव्हती. शहरा-शहरांमध्ये सायबरकॅफे सुरु होत होते. हळू हळू इंटरनेट पसरत होते.

इंटरनेट वर अनेकांनी केलेले पहिले काम असेल इमेल आयडी बनवणे . या द्वारे संदेश कितीही लांब असलेल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना पाठवता येतो हे तो पर्यंत समजायला लागलेले.

असेच काहीसे अमेरिकेतील वॉशिंगटन शहरात सुद्धा.

पीटर बोरोस्की, वॉशिंगटन शहरा  जवळील एका गावात राहणार मध्यम वयीन युवक.

आज पीटर खूप चिंतेत होता, कारण पण तसेच होते, एका मोठ्या स्टार्ट-अप कंपनी मधे पीटर गेली २ वर्षे नोकरी करीत होता, पण कंपनी नुकसानीत जात असल्याचे कारण देऊन कंपनीने अनेक कर्मचार्यांना नोकरी वरून काढले होते. पीटरचे दुर्दैव कि त्याचे नाव या यादीत होते. पीटर ला काहीही करून पुढील एका महिन्यात नवीन नोकरी हवी होती. कारण पीटर हाच एकमेव त्याच्या घरातील कमावता होता.

पीटरने या नोकरी आधी दोन छोट्या कंपन्यांमध्ये मार्केटिंग ची नोकरी केली होती, तर आत्ता तो ऑफिसबॉय म्हणून नोकरी करत होता.

पीटरने घरी येऊन सर्व पत्नीला सांगितले, पत्नीने पीटरला समजावले तिने काही सेविंग केले होते त्यावर घर अजून १ महिना चालेल हा विश्वास पीटरला दिला. त्याने पीटरचा आत्मविश्वास वाढला. दोन महिन्यात कुठेही नोकरी मिळेल असा विश्वास त्याला होता. दुसर्याच दिवसापासून पीटरने नोकरीसाठी अर्ज लिहिण्यास सुरुवात केली, रोज शहरातील वेगवेगळ्या कंपन्यानमध्ये जाऊन तो अर्ज देऊ लागला. २-३ ठिकाणी इंटरविएव सुद्धा दिला.

दिवसामागून दिवस गेले, आता मात्र पीटरला भीती वाटू लागली, एक महिन्याहून जास्त वेळ निघून गेला होता, साठवलेले  पैसे लवकरच संपणार होते. गेले कित्त्येक दिवस पीटर त्याचा आवडता खेळ बास्केटबॉल सुद्धा खेळायला गेला नव्हता. आज मात्र पत्नीच्या सांगण्यावरून मूड फ्रेश करण्यासाठी पीटर बास्केटबॉल खेळण्यास आला, मित्र भेटले त्यांनी इतके दिवस खेळायला न येण्याचे कारण विचारले, पीटरने सुरुवातीला थोडी टाळा टाळ केली, मात्र तो स्वताला जास्त रोखू शकला नाही. इतक्या दिवसांचे सर्वकाही त्यांनी मित्रांना सांगितले.

शहरातील अनेक कंपन्यांची अवस्था खूप बिकट होती, अनेक ठिकाणी माणसे कमी करून ते काम संगणक करू लागला होता. प्रत्येक जण पीटरला समजावत होता आता काहीतरी नवीन शिक , संगणकाचे ज्ञान घे. त्यातूनच नवीन नोकरी मिळेल. सर्वांचे सल्ले घेऊन पीटर घरी परतला. आता पुन्हा काही नवीन शिकायचे कि नाही या विचारात संपूर्ण रात्र गेली.

सकाळी उठल्यावर नेहमी प्रमाणे पीटरने वर्तमान हातात घेतले आणि नोकरीच्या जाहिराती पाहू लागला. आज एका जाहिरातीने पीटरचे लक्ष खेचले आणि काहीही करून ही नोकरी मिळवायचीच असे पीटरने ठरवले.

ती जाहिरात होती मायक्रोसोफ्ट या कंपनीची.

लगेजच पीटरने सर्व कागद पत्रे जमवली आणि दुसर्याच दिवशी कंपनीमध्ये इंटरविएव देण्यासाठी पीटर पोहोचला. पण गेट वर पोहोचल्या पोहोचल्या लांबच लांब रांग बघून पीटरचा हिरमोड झाला. एवढ्या लोकांमधून आपली निवड कशी होणार या चिंतेत पीटर होता.

शेवटी संध्याकाळी ४ वाचता पीटर चा इंटरविव झाला.

पीटर खूप खुश होता , कारण त्याला दुसर्या दिवशी HR इंटरविव साठी बोलावण्यात आलेले.

दुसर्या दिवसाचा इंटरविव पण खूप चांगला झाला, पीटरची मायक्रोसोफ्ट मध्ये ऑफिसबॉय म्हणून निवड झालेली, शेवटच्या काही औपचारिकता बाकी होत्या.

त्या पूर्ण करण्यासाठी पीटर  मायक्रोसोफ्ट च्या HR ऑफिसर ला भेटला, सर कागदपत्रांची पूर्तता झाली. सर्वात शेवटी HR ऑफिसरने पीटरकडे त्याचा इमेल आयडी मागितला.

आणि पीटरने मी अजून इमेल बनवला नाही असे सांगितले. त्यावर मायक्रोसोफ्टचा HR अधिकारी खूप चिडला, आजच्या काळात इमेल आयडी बनवला नाही म्हणून पीटरला त्याने खूप ऐकवले आणि ही नोकरी त्याला मिळू शकत नाही असे सांगितले.

आता मात्र पीटर संपूर्णपणे हरला होता, मित्रांचे  ऐकले असते तर कदाचित ही नोकरी मिळाली असती असे त्याला वाटले. तेथून बाहेर पडल्यावर बँकेतील सेविंग बघण्यासाठी तो बँक ऑफ अमेरिका मध्ये जातो. खात्यात अजूनही १००$ शिल्लक असतात.

पण हे शेवटचे १००$ अजून किती दिवस पुरतील या विचारात पीटर बँकेतून बाहेर पडतो.

आता काहीतरी वेगळे करावेच लागणार हा विचार त्याच्या डोक्यात थैमान घालत असतो, पण काय हे त्याला समजत नसते. आज मायक्रोसोफ्ट च्या इंटरविवसाठी पीटर त्याच्या घरापासून ६० मैल दूर आलेला, इथून जाता जाता पीटर च्या लक्ष्यात येते या परिसरात वस्ती वाढली आहे. इथे अनेक छोट्या मोठ्या अपार्टमेंटस बनत आहेत.

पीटरने आपली गाडी या नवीन अपार्टमेंटस च्या रस्त्यावर वळवली, त्याच्या नजरेस आले, इथे अनेक चीनी आणि भारतीय कुटुंबे वास्तव्यास आहेत. कारण दुपारच्या ऑफिस च्या वेळेत सुद्धा इथे अनेक स्त्रिया दिसत होत्या.

आता पीटर चे डोके खूप जोरात चालू लागले, गाडी वेगवेगळ्या अपार्टमेंटस मधे नेऊन तिथे १०-१५ मिनिटे थांबून पीटर कसलातरी विचार करत होता.

आता मात्र पीटर तिथून निघाला वेगात तो पुन्हा बँक ऑफ अमेरिकामध्ये पोचला. बँकेतून पीटरने सर्व १००$ काढले, तिथून तो त्याच्या शहरातील सर्वात स्वस्त होलसेल मार्केटमध्ये गेला, जिथे त्यांनी १००$ मध्ये काही फळे काही भाज्या आणि भारतीय मसाले विकत घेतले.

हे सर्व घेऊन पीटर पुन्हा त्या अपार्टमेंटस जवळ पोहचला, फळे, भाज्या आणि मसाले पाहून अनेक स्त्रियांनी पीटर कडून सामान खरेदी केले. पीटरने वेगवेगळ्या ठिकाणी आपली गाडी उभी करून फळे आणि भाज्या विकल्या. पहिल्याच प्रयत्नांत पीटरचे सर्व सामान फक्त २ तासात संपले. आता पिटर हिशोब करू लागला.

पीटरने फक्त २ तासात ३०$ चा नफा मिळवला होता,  आता मात्र पीटर खूप खुश होता, डोक्यात अजून नवीन नवीन कल्पना सुरु होत्या. संपूर्ण १३०$ चे सामान पीटरने दुसर्यादिवशी विकत घेतले आणि ते देखील हातो हात फक्त काही तासातच संपले. पीटर पुन्हा मार्केट मध्ये गेला आणि सामान घेऊन आला, असे त्यांनी त्या दिवशी ३ वेळा केले. आज संपूर्ण दिवसात पीटरने २००$ चा नफा मिळवला. हा नफा त्याच्या आधीच्या पगारापेक्षा जास्त होता.

इथून पीटरच्या नवीन संकल्पनेची सुरुवात झाली, रोज वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पीटर फळे भाज्या मसाले इतर अनेक गृहपयोगी सामान घरपोच देऊ लागला. काहीच महित्यात पीटरने अजून एक जुनी गाडी विकत घेतली. आता पीटर कडे काम करणारा एक कर्मचारीही होता.

पीटरचा व्यवसाय वाढत चालला होता, एका वर्षात पीटरने स्वताचे होलसेल चे दुकान सुरु केले.

आता पीटरच्या व्यवसायाला २ वर्षे पूर्ण झाली होती, ४ गाड्या आणि २ होलसेल दुकानांचा तो मालक होता. अमेरिके बाहेरील नागरिक हे त्याचे मुख्य ग्राहक होते. त्यांना हवे असलेले सगळे सामान फक्त पीटरच्या दुकानात मिळत असे.

आता व्यवसाय वाढत चाललेला, म्हणून व्यवसायाचा संपूर्ण हिशोब व्यवस्थित राहावा यासाठी पीटरने आपल्या दुकानासाठी एखादे सोफ्टवेअर बवून घ्यावे असे ठरवले. अनेकांच्या मुलाखती घेतल्या आणि शेवटी वॉशिंगटन युनिवर्सिटी मधील ४ विद्यार्थ्यांना हे काम द्यायचे ठरवले.

व्यवसायाची संपूर्ण माहिती पीटरने या विद्यार्त्यांना दिली. सर्व माहिती घेऊन ते निघतच होते, तेवढ्यात एका विद्यार्थ्याने पीटर ला विचारले.

“सर, तुमच्या व्यवसायाचा आम्ही पूर्ण अभ्यास करू आणि आमचे सोफ्टवेअर तुम्हाला व्यवसाय सांभाळायला आणि अधिक वाढवायला कसे मदत करेल याची संपूर्ण माहिती तुम्हाला देऊ.

आम्हाला तुमचा इमेल आयडी मिळू शकेल का?”

हे ऐकताच पीटरने इमेल आयडी नाही असे सांगितले.

या वर दुसरा विद्यार्थी बोलला,

“सर इमेलआयडी सुद्द्धा नसताना आपण एवढा मोठा व्यवसाय सुरु केला आणि तो यशस्वी पणे चालवताय. आज तुम्ही २ दुकानांचे मालक आहात, तुमच्या गाड्या शहरातील अनेक अपार्टमेंटस मध्ये सामान पोहचवतात. तुमचा दिवसाचा निव्वळ नफा आज ३०००$हून अधिक आहे. तुमच्या कडे १७ कर्मचारी काम करतात, आता  विचार करा जर तुमच्या कडे इमेलआयडी असता तर आज तुम्ही कुठे असता?”

हा प्रश्न ऐकताच पीटर २ वर्षापूर्वीच्या आठवणीत पोहोचला, आणि तो शेवटचा इंटरविव आठवून मनोमन हसला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here