Marathi Movie BP : बीपी (बालक पालक)

8
30080

Marathi BP : बीपी (बालक पालक)

मराठी चित्रपट खरच एका वेगळ्या वाटेने जात आहे… देऊळ, शाळा, काकस्पर्श असे अनेक वेगळ्या विषयांवरील चित्रपट या वर्षी प्रेक्षकांसमोर आले…आणि हे सर्व चित्रपटांनी अगदी ऊतम अशी कमाई सुद्धा केली..

आता प्रेक्षकांसमोर येत आहे बीपी…नाव ऐकूनच अचाट पडलात ना…

बीपी म्हणजे बालक पालक…

Balak Palak

दिग्दर्शक:   रवी जाधव
निर्मिती: रितेश देशमुख, उत्तुंग हितेंद्र ठाकुर आणि मेघना जाधव
लेखक: गणेश पंडित, अंबर हडप  आणि रवी जाधव
कलाकार: सुबोध भावे, सई ताम्हणकर, किशोर कदम, मदन देवधर, शास्वती पिंपलेकर, भाग्यश्री शंकपाल
संगीत : विशाल-शेखर
संगीतकार: चिनार-महेश
मराठीबोली च्या संपर्कात राहण्यासाठी आपला इमेल आयडी द्यावा:

बालक पालक हा चित्रपटाची, साऊथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलसाठी निवड झालेली आहे.. ही बातमी नुकतीच चित्रपटाचा निर्माता उत्तुंग ठाकुर याने आपल्या फेसबुक वॉल वर पोस्ट केली..

मुले आणि त्यांच्या पालकां मधील संवाद या चित्रपटाद्वारे रसिकांस पाहावयास मिळणार आहेत.. पौंगडावस्थेतील मुलांची ही कथा आहे.. त्यांना पडणारे प्रश्न, त्याची पालकां कडून मिळणारी उत्तरे …आणि मुलांनी स्वतः शोधलेली उत्तरे …अशी ही कथा आहे..

बालक पालक हा चित्रपट हा एकांकिकेवर आधारित आहे…आणि या एकांकिकेमधील काही कलाकार चित्रपटातसुद्धा काम करत आहेत. य चित्रपटा द्वारे अनेक नवीन चेहरे मराठी चित्रपट सृष्टीमध्ये प्रवेश करत आहेत..

या मध्ये बॉलीवुड मधील विनोदि नट रितेश देशमुख, पहिल्यांदाच मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे.. तर विशाल-शेखर या जोडीचा हा पहिलाच मराठी चित्रपट

बालक पालक चित्रपटाचा काही भाग..

[tube]TtBRmNz4ugI[/tube]

चित्रपटातील कलाकारांशी बोलूया…राजश्रीमराठी च्या मदतीने..

[tube]Ny2LgCIFZf0[/tube]

हा चित्रपट…आपल्याला आपल्या बालपणात घेऊन जाण्यात यशस्वी होतो की नाही ते आपल्याला लवकरच कळेल..

8 COMMENTS

 1. नमस्कार, मी काल बापक-पालक हा चित्रपट पहिला खूप संदूर चित्रपट आहे, सर्वानी एकदातरी पाहावा. आज ची पिढी हि लवकर आपले बालपण विसरून जाते आहे. जे वय खेळण्याचे आहे त्या वयात भलत्याच गोष्टीमुळे त्यांचे मन विचलित होते. काहीवेळा पालकांनाही प्रश्न पडतो कि आपल्या मुलांना काय सांगावे? कोणत्या गोष्टी त्यांच्यापासून लपवायच्या? त्यांना काही गोष्टी कशा सांगायच्या/समजावयाचा अजून बरेच काही. आजच्या पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे कि क्षणिक सुखासाठी त्यांचे बालपण हरवू शकते. बालपण हि अशी गोष्ट आहे कि ती निघून गेली कि परत कधीही आयुष्यात येत नाही. त्यामुळे पुढील पिढीचा विचार करता या चित्रपटातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
  हा चित्रपट अजून १५-२० मी. वाढवून त्यावरील उपाय सविस्तर सांगितले असते तर अजून चांगले झाले असते. कारण बऱ्याच पालकांसमोर हे प्रश्न उपस्थित होतात पण नेमके काय करावे हे कळत नाही. कारण बाल वयात बऱ्याच गोष्टींचे कुतूहल असते. सध्या टीव्ही वरील मालिका, चित्रपट, वर्तमानपत्र अश्या अनेक साधनांमुळे बाल वयात त्यांच्या समोर बरेच प्रश्न उपस्थित होतात. त्यांना शोधण्याचा ते प्रयत्न करू लागतात. नकळत त्या चुकीच्या गोष्टींकडे वळतात आणि त्यांचे बालपण संपते आणि बाल वयातच त्यांना नको ते छंद लागतात, त्यांना आपण खूप मोठे झाल्यासारखे वाटतो किंवा आपण लवकर मोठे झाले पाहिजे असे वाटते त्यातून मोठ्या लोकांचे अनुकरण करणे, सामाज्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे यासारख्या गोष्टी घडतात. यागोष्टी कशा थांबवल्या पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज आज आहे.
  धन्यवाद,
  प्रजोत कुलकर्णी
  मो. 9764231160

 2. नमस्कार, मी काल बापक-पालक हा चित्रपट पहिला खूप संदूर चित्रपट आहे, सर्वानी एकदातरी पाहावा. आज ची पिढी हि लवकर आपले बालपण विसरून जाते आहे. जे वय खेळण्याचे आहे त्या वयात भलत्याच गोष्टीमुळे त्यांचे मन विचलित होते. काहीवेळा पालकांनाही प्रश्न पडतो कि आपल्या मुलांना काय सांगावे? कोणत्या गोष्टी त्यांच्यापासून लपवायच्या? त्यांना काही गोष्टी कशा सांगायच्या/समजावयाचा अजून बरेच काही. आजच्या पिढीला समजावून सांगण्याची गरज आहे कि क्षणिक सुखासाठी त्यांचे बालपण हरवू शकते. बालपण हि अशी गोष्ट आहे कि ती निघून गेली कि परत कधीही आयुष्यात येत नाही. त्यामुळे पुढील पिढीचा विचार करता या चित्रपटातून खूप काही शिकण्यासारखे आहे.
  हा चित्रपट अजून १५-२० मी. वाढवून त्यावरील उपाय सविस्तर सांगितले असते तर अजून चांगले झाले असते. कारण बऱ्याच पालकांसमोर हे प्रश्न उपस्थित होतात पण नेमके काय करावे हे कळत नाही. कारण बाल वयात बऱ्याच गोष्टींचे कुतूहल असते. सध्या टीव्ही वरील मालिका, चित्रपट, वर्तमानपत्र अश्या अनेक साधनांमुळे बाल वयात त्यांच्या समोर बरेच प्रश्न उपस्थित होतात. त्यांना शोधण्याचा ते प्रयत्न करू लागतात. नकळत त्या चुकीच्या गोष्टींकडे वळतात आणि त्यांचे बालपण संपते आणि बाल वयातच त्यांना नको ते छंद लागतात, त्यांना आपण खूप मोठे झाल्यासारखे वाटतो किंवा आपण लवकर मोठे झाले पाहिजे असे वाटते त्यातून मोठ्या लोकांचे अनुकरण करणे, सामाज्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलणे यासारख्या गोष्टी घडतात. यागोष्टी कशा थांबवल्या पाहिजे याकडे लक्ष देण्याची गरज आज आहे.
  धन्यवाद,
  प्रजोत कुलकर्णी
  मो. 9764231160

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here