Marathi Kavita – Chimani – चिमणी
कुठे हरवली ती चिमुकली चिमणी,
अंगणात गाणारी चिऊ चिऊ गाणी,
इवल्याश्या चीचीने वेचणारी दाणी,
थवा करून राहणारी चिमुकली चिमणी,
एकजुटीचा संदेश देणारी वाणी,
आम्ही म्हणत होतो तिला चिउताई,
तिच्या आवाजाने सुरू होई आमची घाई,
न चुकता टाकी दाणापाणी आई,
फस्त करी थव्याने लगेच आमुचि चिउताई,
चोचिने आणि काडी कचरा वेचूनी चिमणा चिमणी,
सुंदर असे घरटे बांधी घरात आणि,
इवलेसे पक्षी ठेवी घरट्यात चिमणा चिमणी,
भरवी त्यांना चोचिने दाणापाणी,
पंख फुटल्यावर पिल्लू घेई भरारी,
पारखे झाले हे सर्व आमुच्या दरी,
गवसेल का परत आम्हा चिउताई,
तिला शोधतो आम्ही दारोदारी..
(स्वाती वक्ते)
Buy Marathi Kavita Books from MARATHIBOLI.COM