रंगीत विश्व – Marathi Kavita

1
28
Marathi Kavita – Rangit Vishwa – रंगीत विश्व

Marathi Kavita – Rangit Vishwa – रंगीत विश्व

कवयित्री – रुचा साळुंके

आज रंगीन रंगात रंगीत विश्व
रंगबेरंगी रंगछटेने रंगून जाणार….

कृष्ण वर्णात मलीन झालेलं हे विश्व
आज रंगांमध्ये न्हाऊन निघणार,
अविश्वास,क्रोध अशा अनेक कारणाने गुरफटलेलं मन
आज माणसांमध्ये एका ठिकाणी स्थिरावणार…

अलिखित नियमातल्या एकांताला विराम लागून
पूर्वापार एकतेचा मेळ पून्हा लागणार,
स्वविचाराने माखलेलं अबोल चित्त
आज सर्वांमध्ये रममाण होणार…

स्वरचित पारतंत्र्याच्या युगाचा उंबरठा ओलांडून
तेजोमय पाऊल बाहेर पडणार,
महागडा आपला ‘माणुसकी धर्म’
आज विश्वकृपेने मोफत मिळणार…

ममता इतकी बहरणार की भूमीमायसुद्धा अपुरी पडणार
अमाप एकता आसमंती अभिमानाने भिडणार,
मग नभाला होणाऱ्या अलगद स्पर्शाने
प्रफुल्लतेचाही वर्षाव होणार…

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here