नारीशक्ती – Marathi Kavita

0
103
Marathi Kavita – Narishakti

Marathi Kavita – Narishakti – नारीशक्ती

कवयित्री – सौ.ज्योती सुनील पाटील

तूच असे आदिमाता
तूच असे आदिशक्ति
तूच आमची नारीशक्ती
तुझीच घडो सदा भक्ति….(१)

आईच्या उदरातून जन्म घेता
स्त्री शक्ती पणास लावते
प्रसूती वेदना सहन करूनी
एका जीवास जगात आणते…(२)

बाळांची ती ढाल बनते
अन्यायाला वाचा फोडते
न्यायासाठी पेटून उठते
स्त्री जन्माची घुरा वाहते….(३)

धैर्यवान हिरकणी तू
बाळासाठी कडा उतरली
आई मधली जागृत शक्ती
स्त्रियांसाठी प्रेरणा बनली….(४)

रण रागिणी झाशीची राणी
रणांगणात शौर्याने लढली
इतिहासाच्या पानावरती
नारी शक्तीची शान कोरली….(५)

सौ.ज्योती सुनील पाटील
जोगेश्वरी मुंबई
9820963832

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here