सायको – Marathi Katha

1
151
Marathi Story – PsycMho

Marathi Story – Psycho – सायको

लेखक – नितीन पासलकर

“पुण्यात दोन आठवड्यांत तब्बल सहा भिकार्यांची हत्या झाली . राज्यभरात हा आकडा सुद्धा वाढला आहे. सर्व हत्यांची पध्दत एकच आहे . डोक्यात दगड घालून निष्ठुरपणे कवटीचा भुगा होईपर्यंत केलेला मार.. भिकार्यांची हत्या करणारा कोणीतरी ‘मनोरुग्ण’च असावा आमच्या सुत्रांना दिलेल्या मुलाखतीत पोलीस अधिकार्यांनी दावा केलाय. शहरात कोणीतरी नवीन ‘रमण राघव’ आल्याने ,दहशतीच वातावरण आहे.” 
टीव्ही न्यूज अॅकरच्या गोंगाटानंतर एक  जाड मनुष्य नुकताच मयत झालेल्या नातेवाईच्या आठवणीत कॅमेरासमोर असलेला दिसत होता.

” हे पाहा शहरात जे चाललंय ते भयानक आहे, हा जो कोणी आहे तो पैशासाठी खून करत नाही आहे.जर अस असत तर त्यानी ‘भिकारी’ मारले नसते. हा कोणीतरी ‘सायको’ आहे.हा जो कोणी रमण राघव , चार्ल्स शोभराज किंवा मोहन ,या शहरात आहे तो लवकरच आपल्यासमोर असेल” 
हे नेहमीच रटाळ भाषण संपवुन तो माणूस गडबडीत चालता झाला .

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●● 

19 वर्षापूर्वी सत्यजीत पाटीलचा औरंगाबाद मध्ये जन्म झाला . तो जन्मल्यावरच काही दिवसात त्याचा बाप नाहीसा झाला. काही म्हणायचे की नवीन धरणाच बांधकाम पुर्ण होत नव्हत , म्हणून एक जिवंत नरबळी म्हणून त्याच्या बापाला जिवंत पुरल गेल. काही सांगायचे की तो त्याच्या आईच्या ईतर अनैतिक संबंधाला वैतागून गेला.  बाप गेल्यापासून सत्यजीत आणि त्याच्या आईला त्याच्या ईतर नातेवाईकांचाही आधार नव्हता. घराचा सर्व खर्च उदरनिर्वाह त्याची आई भागवत होती. तरुण वयात नवरा सोडून गेल्याने तिच्यासमोर पुर्ण आयुष्य पडल होत. सत्याची वीशी ओलाडल्यानंतर सुद्धा त्याच्या आईनी कधी कपाळाच कूंकू पुसल नव्हत. शाळेत त्याच्या मित्रांकडून त्याला त्याच्या आईवरुन शिव्या ऐकायला मिळायच्या. ‘बनियाभाय की नाजायज औलाद’ म्हणून त्याला चिढवल गेल होतं.
त्याची ‘आई’च त्याच्यासाठी सर्वकाही होती. एकदिवस दुपारी तो आजारी असल्याने काॅलेजमधुन लवकर घरी आला… आणि त्याच्या मित्रांकडुन ज्या गोष्टी त्याला ऐकायला मिळत होत्या त्या त्याच्या समोर होत्या.

बर्याच वर्षाच्या ओसाड नदीला ‘ओढा’ येऊन मिळावा, तसा तो तिच्या समोर होता.ओसाड नदीने ओढ्याच्या आलिंगनाने पुन्हा पुनर्जिवीत होउन वाहावं , आणि बेसुर झालेली गावेच्या गावे आपल्या पाण्याच्या लोटांनी कवेत घ्यावीत. कवेत घ्यावं प्रत्येकाला जो एकटेपणाला वैतागला आहे . अशा बेभान नदीईतकी ती आसुसली होती. तिचे उरोज त्याला आकर्षित करत होते. त्याने तिला जवळ घेतल. तिच सर्वांग थरथरत होत. तिच्या अंगावर आलेला शहारा त्याला जाणवत होता .तिच गात्र न गात्र पुलकीत झाल होत.त्याचा हात तिच्या नितंबावरून तिच्या केसांकडे सरकत होता.तो तिला छातीशी कवटाळत होता..तिचे श्वास जोर धरू लागले होते. प्रत्येक श्वास हा तापवलेल्या पाण्याच्या वाफेईतका गरम होता.तिचा श्वासांचा वेग क्षणागणिक वाढत होता. तो तिच्या शरीरावरून  जिथजिथून हात फिरवत होता तिथे तिथे तिच्या शरीरावर रोमांचाने काटे उभे राहात होते. तो तीच्या जीभेशी जीभ भिडवत होता दोन सापांच्या मिलनासारख्या त्या एकमेकांशी गुंफत होत्या. तिच्या ओठांला ओठ लावून तिचा श्वास तो खेचून घेत होता .तिच शरीर तिने त्याच्या स्वाधीन केल होत. त्याच्या बाहूपाशात असताना तिची नजर बंद होती. डोळे मिटलेले होते ति पुर्णत चिंब झाली होती.  
दोन शरीरांच युद्ध सुरू झाल होत श्वासांचा वेग पुर्वी पेक्षा दुप्पट झाल होत. त्याची छाती तिच्या उरोजांवरती आदळत होती.बर्याच वेळ हा शरीरांचा संगम सुरू होता ..अखेरीस सर्व थांबल..दोघांच्या चेहर्‍यावर एक वेगळच सुख होत. ती अलवार त्याच्या छातीवरती हात ठेवून जगाची बंधन झुगारत पहुडली होती. तिच्या चेहर्यावर एक समाधान होत. ‘वाळवंटातल्या तहानलेल्या प्रवाशावरती अचानक वर्षा व्हावी ‘
अस तिच्या बाबतीत घडत होत.

विशी ओलांडलेला तिचा मुलगा हे बाहेरुन पाहात होता. ती पूर्ण भान हरवली होती. सत्या तेथुन तडक उठला आणि थेट नदी गाठली . त्याने जे त्याच्या डोळ्यासमोर पाहील होत ते त्याच्या समजण्यापलीकडे होतं.

तिथून बराच वेळ नदीशी संवाद केल्यानंतर तो शाळा सुटण्याच्या नेहमीच्या वेळावर तो घरी हजर झाला .जणू काही घडलेच नाही , असे तो दाखवत होता.

“काय रे ? आज खूप शांत बसलायेस ..शाळेत मारल का?”  त्याच्या आईनी त्याला जवळ घेत विचारलं.

हिच ती स्त्री आहे का ? जी काही क्षणापुर्वी ईतर परपुरूषाबरोबर शय्या सजवत होती , कोण आहे हि? का हिने माझा विचार केला नसेल ? बर्याच प्रश्नांनी त्याला भंडावुन सोडल होत.

“नाही, थोड डोक दुखत होत” म्हणून तो बराच शांत झाला.

तो आज न जेवताच झोपला . पण काही आवाज त्याच्या कानाभोवती घुमु लागले. “बनिया का बेटा” म्हणून हिनवणारा प्रत्येक आवाज त्याच डोक चिरु लागला. तो झोपेतुन उठला. आजुबाजुला पाहील. कोणीही नव्हत. दोन्ही कानावरुन हात ठेवून तो जमीनीवर आदळला. आज बराच वेळ त्याला झोप आली नव्हती. अखेर त्यानी निर्धारानिशी त्याची बॅट उचलली. तो ती बॅट घेउन त्याच्या आईच्या दिशेने सरसावला . त्याची बॅटवरची पकड ढिली होत होती . त्याला मध्येच हुंदके येत होते. ते हुंदके आवरण्यासाठी त्याने स्वतःच्या तोंडात रुमाल कोंबला होता. त्याचे हात जड होत होते. हिम्मत हार मानत होती.
पुन्हा मध्येच “बनिया का बेटा” म्हणून खिदळत हसणारे आवाज त्याच्या कानी पडले. बॅटवरची पकड मजबूत झाली .
“नाही .. नाही” तो जोरात बॅट आपटत ओरडत होता . बॅटवरची पकड त्याच्या प्रत्येक आक्रोश आणि हुंदक्यानंतर अधिक घट्ट होत होती. खालुन रक्ताची नदी वाहात होती. समोर त्याची जन्मदात्री अखेरच्या घटका मोजत होती. त्याची बॅट रक्ताने लाल झाली होती.
त्याच्या मनात कुठलीच दया नव्हती .  डोक्याच्या कवठीचा भुगा होईपर्यंत तो त्याचे तूकडे करत होता. शेवटी डोक्यातून मांसल भाग बाहेर आला तेव्हा तो कोसळला.तो मांसल भाग त्याच्या बॅटच्या वरच्या भागाला चिकटला होता. . आता तो बर्यापैकी शुद्धीवर आला . पुन्हा धावत जाउन त्यानी त्याच्या आईला उठवण्याचे प्रयत्न केले. अखेरपर्यंत तिचे डोळे मिटलेले होते.तिच्या आयुष्यातली ‘दुःख’ ती स्वतःसोबत घेउन गेली होती.
तो घामाने ओलाचिंब झाला होता.  तिच्या त्या मृत पडलेल्या शरीराचे , डोक्यावर हात ठेवत,एकटक पाहात त्याने रात्र जागली . उगवत्या सुर्याकडे तो डोळे लावुन पाहात होता.बाहेर कुत्र्यांचा गोंगाट सुरू होता. ईतक्यात बाहेर पडायचा विचार त्याने सोडून दिला.

सकाळ होताच ,त्याने घराचा दरवाजा लावुन थेट रस्ता गाठला. बर्याच गाड्या बदलत तो पुण्याच्या स्टेशनवरती आला.  त्याच्या डोक्यातून ‘ती’ दृश्य जात नव्हती. 
अशा अवस्थेत तो रेल्वेच्या प्लॅटफॉर्मवरच्या बाकड्यावर झोपी गेला. बर्याच वेळच्या थकव्यानंतर त्याला गाढ झोप लागली होती. डोक्यांच्या पापण्या एकमेकांना बर्याच वर्षांनी भेटलेल्या प्रियकराला प्रेयसीने घट्ट मिठी मारावी ईतक्या बिलगून चिकटल्या होत्या . ईतक्यात त्याला आवाज आला..

“ओ साहेब , पाच रूपये द्या ना! खाल्ल नाय ओ काही..” 
एक भिकारी त्याला हात लावुन जागा करत होता. त्याच्या मागे  दोन ते तीन भिकारी ते दृश्य पाहात होते.

सत्या स्वतःला सावरत , डोळे चोळत उभा राहात होता . ईतक्यात त्याच्या कानात आवाज घुमला..
“ये देखो, बनिया का बेटा” 
आणि त्याच आवाजात भिकारी त्याच्याकडे हसुन पाहत ईतर भिकार्यांला खुणवत होता. 
बाकी भिकारी हसत त्याला साथ देत होते. 
त्याने सरळ त्या भिकार्याच्या गळ्याला हात घातला.त्याच्यावरती एखाद्या अधाश्या नरभक्षी प्राण्यासारखा तुटुन पडला.
ईतक्यात  प्लॅटफॉर्मवरती जमा झालेल्या लोकांनी त्यांला वेगळ केल. 
“अरे पैसा देनेका तो देना ..मार क्यो रहा नाजायज* ..” 
त्या भिकार्याला लोकांनी ओढत बाजूला घेउन जात असताना शिवी दिली.
ईकडे काही लोकांनी त्या विशीतल्या मुलाला ओढत बाजुला केलं. सत्या तिथुन चालता झाला. बराच अंतर चालल्यानंतर रात्र झाल्याने तो तिथंच झोपी गेला. डोळा लागतो न लागतो तोच समोरुन एक भिकारी चालत येत होता .
तो जवळ येताच “बनिया का बेटा नाजायज* !” म्हणून त्याने दिलेली शिवी सत्याच्या कानात घुसली. तो तडक  उठला आणि हातात दगड घेउन त्या भिकार्याच्या खोपडीला सुपारी फोडण्याईतक्या सहज फोडुन काढल. भिकारी मरुन पडला. शेजारी रक्ताचा पाट वाहात होता. भिकारी मेल्यानंतरही ‘तो’ अधिकाधिक गतीने त्याच्या कवटीवर वार करत होता. कवटीच्या अगदी ठिकर्या उडाल्या होत्या. क्षणभर आवाज बंद झाला . एखाद्या विजयी वीरासारखा आसमंताकडे पाहात त्याने रागासरशी डरकाळी फोडली. ईतक्यात प्रत्युतर आले – “बनिया का बेटा..नाजायज”  ! तो आकाशाकडे मान उंचावून पाहात होता. वीजांच्या गडगडातुन आकाश त्याच्यावर हसत होतं. तसाच जमीनीवर , शेजारी बरीच वर्ष निद्रिस्त असलेला एक दगड उचलुन त्याने आकाशाच्या दिशेने फिरकावला. आवाज अजुनही चालू होता.वीजांच्या गडगडातुन अंधकारमय आकाशच विचित्र हास्य त्याला ऐकु येतच होत.
भिकार्याला मारल्यावरही  त्याचा तो शिवीचा आवाज त्याच्या कानात तसाच होता . 
त्याने आता स्टेशनकडे पाय वळवले.’तो’ आवाज कानात अजूनही घूमत होता. प्लॅटफॉर्मवर एका बाकड्यावर एक भिकारी झोपला होता. त्याला पाहताच , सत्याने दगड उचलुन त्याच्या डोक्यात घातला . एका दगडातच बेसावध झोपलेला भिकारी जीवनमुक्त झाला.
ईतक्यात समोरुन येत असलेला भिकारी ओरडत
पळताना त्याला दिसला. साक्षात यम त्याचा पाठलाग करत होता. त्याचे पाय एकमेकांत गुंतत होते . श्वास घोड्याशी पैंजा करत होते. अखेरीस थाप लागुन भिकारी पडला . समोर सत्या उभा होता.
त्याने त्याचा पाठलाग करुन शेजारी पडलेल्या एका लोखंडी गजाने त्याच्या मेंदुला कवटीपासुन मुक्ती दिली.  त्याने ओरडण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या प्रत्येक आक्रोशानिशी त्याच्यावर होणार्या वारांचा वेग वाढत होता. अखेर आवाज थांबला. सत्याने खाली वाकुन त्याच्या तोंडाजवळ कान नेत , कानावर हात ठेवून आवाज ऐकण्याचा प्रयत्न केला..
शेजारुन चाललेल्या रेल्वेच्या आवाजातुन त्याला ‘तो’ आवाज पुन्हा ऐकू आला. हातातला राॅड त्याने रेल्वेच्या जवळ जाउन जोरात मारला. तो धडकुन पुन्हा त्याच्या डोक्यावर बसल्याने त्याच्या डोक्यातून रक्त वाहायला सुरुवात झाली. डोक्याला हात लावून, आलेले रक्त पाहताच तो पुन्हा तो लोखंडी राॅड घेउन रेल्वेच्या डब्यांमागे धावु लागला. बराच धावल्यानंतर तो बाजूला जाउन पडला. त्याच्या पराभवावरती दुर गेलेली रेल्वे खिदळून हसलेली त्याला ऐकु येत होती. त्याने पुन्हा रागाने उठण्याचा प्रयत्न केला . पण थकलेल्या शरीराने हार मानली होती . तो तेथेच स्वतःला जमिनीच्या हवाली करुन आकाशाला धमकावत झोपी गेला.

अशा एका आठवड्यात त्याने शहरातल्या सहा भिकार्यांला जीवानीशी मारले.अगदी एकेकाच्या डोक्याच्या चिंधड्या केल्या. रक्ताच्या रंगात तो न्हावुन निघाला . कानात घुमणार्या आवाजाने त्याला मुक्ती दिली ,नव्हे नव्हे त्याने ती मिळवली होती.
तो शिर्डीकडे निघाला.  आज त्याला मोकळ वाटत होत.  मागील दिवसातल्या गोष्टी क्षणभर का होईना तो विसरायचा प्रयत्न करत होता.  या वातावरणात त्याला शांतता लाभली होती.  मंदीर आणि ईतर कार्यक्रमातल्या जेवणावरच त्याच आजची सोय होती. मंदीर अन् मंदीर तो भटकत होता.
त्याला आज शांत झोप लागली होती. त्याच्या नजरेसमोर कुठेही त्याच्या आईचा चेहरा येत नव्हता. आकाशाकडे दगड फिरकल्यानंतर त्यानेही त्याच ‘कुत्सित’ हास्य आवरल होत. गेल्या सात दिवसात  काळ्या ढगांनी आभाळावर पाऊल देखील ठेवल नव्हत. वार्याची सुद्धा त्याच्या कानाजवळुन जायची हिम्मत नव्हती. पाखरांच्या किलबिलाटावर तो त्यांच्यावर दगडी फेकून मारत होता.

सकाळ झाली. घंटानादाच्या आवाजाने तो उठला . सगळीकडे फुलांचा सुगंध पसरला होता . भक्तांचे लोटच्या लोट समोरुन जात होते. गर्दीतून एक आई तिच्या मुलाच्या हाताला घट्ट पकडुन त्याला ओढत घेउन चालली होती .हे दृश्य तो बराच वेळ न्याहाळत होता. त्याने बाजुला नजर फिरवली. जिकडे पहावे तिकडे गर्दी दिसत होती . प्रत्येकाच्या चेहर्यावर वेगवेगळे भाव होते. तो गर्दीत स्वतःचा चेहरा शोधत होता. एकेकाची वेगळीच धांदल उडाली होती. फुले विकणारांचा वेगळाच गोंधळ होता. चप्पलांवर लक्ष ठेवण्यासाठी , कुटुंबातुन एक माणूस मंदीराबाहेर थांबत होता. नारळ विकणारा माणूस जोरजोरात ओरडत होता.एका गिर्हाईक स्त्री बरोबर त्याचा वादंग सुरू होता. शेजारी लावलेल्या टेम्पोतुन ‘ओ साथी रे , तेरे बिना भी क्या जीना’ गाण्याचे बोल स्पष्ट ऐकु येत होते.
लहान मुले खेळण्यांच्या दुकानांभोवती गर्दी करत होती. परीसरात गोंगाट झाला होता. सकाळची शांतता शहर सोडून गेली होती. तिची सावलीही पुसटशी दिसत नव्हती. तिच आस्तित्व संपल होत.
त्याने समोरच्या टाकीतुन ओंजळभर पाण्याने तोंड धुतल. बर्याच दिवसानंतर तो स्वतःच्या प्रतिबिंबाला शेजारच्या गटारीत तुंबलेल्या पाण्यात पाहण्याचा प्रयत्न करत होता. केसावरुन हात फिरवुन त्याने पुन्हा पाण्याकडे पाहीले..
ईतक्यात त्याच्या कानावर आवाज पडला..

“बनिया का बेटा..नाजायज!”

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here