Marathi Kavita – Aakat Tu, Ukar Tu – आकार तू उकार तू
कवयित्री – भामरे भाग्यश्री शांताराम
आकार तू , उकार तू
सर्वांना घडविणारा परमेश्वर तू
इच्छा तू ,आकांक्षा तू
सर्वांची इच्छा पूर्ण करणारा इच्छापूर्ती तू
सुरुवात तू ,शेवट तू
सृष्टीला रचणारा रचेता तू
विश्वास तू ,श्रद्धा तू
जीवनाचे धडे शिकविणारा शिक्षक तू
हसविणारा तू ,रडविणारा तू
सुख आणि दुःखात संतुलन साधणारा साधक तू
प्रकाश तू ,अंधार तू
जीवनाच्या प्रत्येक वाटेवर साथ देणाऱा साथी तू
कवित्री :- भामरे भाग्यश्री शांताराम