Marathi Kavita – आठवणी ‘त्या’ पावसांच्या…
दाटलेल्या आभाळांच्या, आकाशातील इंद्रधनुंच्या,
सुटलेल्या सुसाट वाऱ्यांच्या, आठवणी ‘त्या’ पावसांच्या…
रोमांचित मनांच्या, पावसांतील भेटींच्या,
भेटींतील प्रत्येक वचनांच्या, आठवणी ‘त्या’ पावसांच्या…
एकत्र ओलेचिंब भिजल्याच्या, पावसातील ‘त्या’ मिठींच्या,
गुलाबी ‘त्या’ स्पर्शांच्या, आठवणी ‘त्या’ पावसांच्या…
आसवांच्या, आनंदांच्या, मनात उठलेल्या हरेक तरंगांच्या,
साथच्या प्रत्येक क्षणांच्या, आठवणी ‘त्या’ पावसांच्या…
‘पावसाळी’ त्या क्षणांचा भास अजुनी होई मनी
पण गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी…राहिल्या फक्त आठवणी…!
– मिलिंद डोंबाळे (देशमुख)
Auto Amazon Links: No products found.










sundar ahe kavita …..
धन्यवाद प्रशांत !!!