माय मराठी – Marathi Kavita

0
106
Marathi Kavita -Maay Marathi

Marathi Kavita – Maay Marathi

कवी – विराज विलास कोरगावकर

माझ्या मराठीची किमया,
किती वर्णावी तिची माया.

मराठी म्हणजे ज्ञानाचा सागर,
लेखक म्हणजे अमृताची घागर.

मराठी हि लेखकांची नांदी,
साहित्यिकांनी तिला नेली उच्चपदी.

माझ्या मराठीचे गुणगानच न्यारे,
जगभर मराठी साहित्याचेच वारे.

भाषा अवगत असाव्यातच सर्व,
पण इतर भाषांचा नसावा गर्व.

इतर भाषांचा तिरस्कारही नसावा,
परंत, मायबोलीचा अभिमानही असावा.

भाषेची लवचिकता ठरवते माणसाचा स्वभाव,
आपली मातृभाषाच टाकते समोरच्यावर प्रभाव.

घरोघरी मराठीचे पुजन व्हावे,
नवपिढीच्या मनोमनी मराठीचे बीज रुजवावे.

आपल्या मातृभाषेवर असावी निष्ठा,
मराठीच महाराष्ट्राची वाढवते प्रतिष्ठा.

आपल्या मातृभाषेचा आदर करावा,
शक्यतो मराठीच बोलण्याचा आग्रह धरावा.

प्रत्येक मराठी भाषिकाने मायबोली वाढवा,
मराठीला समृद्धी करण्यासाठी उपक्रम राबवा.

कमीपणा वाटतो मराठीतून घेताना शिक्षण,
मराठीला माय समजून करावे तिचे रक्षण.

मराठी भाषेतील कुसुमाग्रज हे एक रत्न,
मराठीला राजभाषा बनवण्यासाठी केले त्यांनी प्रयत्न.

मराठीला आपली माय समजावी,
मायबोलीतील ममता प्रत्येकाला उमजावी.

    नाव :- विराज विलास कोरगावकर
    पत्ता :-मु. पो दाजीपूर, ता. राधानगरी,                       जि.कोल्हापूर, महाराष्ट्र
    वय :- 17
 इयत्ता :- प्रथम वर्ष, विद्युत अभियांत्रिकी                     (डिप्लोमा )

महाविद्यालयाचे नाव :- शासकीय तंत्रनिकेत मालवण, ता. मालवण, जि.सिंधुदुर्ग
मोबाईल :- 9607541305

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here