Marathi Article – काही न जुळलेले गुण!!!
काही न जुळलेले गुण!!!
आमचे काही न जुळलेले गुण , काही म्हणजे केवळ म्हणायला, खर तर सगळेच गुण – अवगुण न जुळणारेच. गेली काही वर्ष एकत्र घालवल्यावर , आता जर कुठे सगुण -निर्गुण च्या जवळ आहे आम्ही . म्हणजे फार काही विशेष नाही न जुळलेल्या गुणांना आम्ही उभायातानी संमती दिली आहे आणि सोयीस्कर रित्या “काना-डोळा” केला आहे . ऐकून न ऐकल्या सारखे आणि बघून न पाहिल्या सारखे . असेच काही दाखले. कदाचित सहजीवनचा खरा अत्थ हि सांगणारे
प्रवेश एक : वर्षे पहिले
ती (मनात) : आज मस्त पुस्तक वाचणार , हि कादंबरी आज संपवायचीच आहे , तसे हि उद्या सुट्टी आहे , आज रात्रीत वाचून होईल
तो(मनात) : आज जर लवकर झोपावे , पाहते लवकर उठून, कैमेरा घेवून बाहेर पडता येयील, तळजाई , पाषाण लेक असे कुठे तरी .
ती: हे काय इतक्या लवकर आवरले आज तुझे , झोपायला रेडी एकदम 🙂
तो : अग , उद्या जायचं न पहाटे,!!!! जायचं न फिरायला उद्या ?
ती: अरे पण पुस्तक वाचायचा प्लान होता माझा, नाही गेलो उद्या तर नाही का चालणार? परत जावू ना , अगदी पहाटेच बाहेर पडू मग .
तो: ठीक ही , फिर कभी. 🙂
प्रवेश तोच : वर्षे दुसरे, तिसरे , चौथे
तो : तू किती वेळ वाचणार अजून?
ती: हा काय प्रश्न आहे का , साहजिकच आहे पुस्तक संपे पर्यंत
तो: उजेडात झोप नाही लागत मला
ती: ? , मी काय करू मग, मला वाचायचे आहे न . मी दुसऱ्या खोलीत जावून वाचते मग . अलीकडेच जर उजेडाचा त्रास व्हायला लागला आहे
तो: हे बघ विषय भलतीकडे नकोय .आणि सकाळी लवकर उठायचे आहे न आपल्याला, मग लवकर झोपायला नको का !!!!
ती: हे कधी ठरलाय?
तो: अग, असे काय , मागच्या रविवारी , बोललो कि आपण , कि असे एखाद्या वीकएंड ला जावू या प्रभात फेरी मारायला
ती: बरोबर , मान्य आपण बोललो , पण एखद्या म्हणजे लगेच पुढच्या हे कधी ठरले ? मनानीच ठरवत नको जावूस
तो: तू अशक्य आहेस
ती: हे बघ जायचे कि नाही हा इश्यू नाहीये , आमच्यात एकट्याने ठरवायची पद्धत नाहीये
तो: आमच्यात पण , दिलेला शब्द मोडण्याची पद्धत नाहीये
ती :तू पण अशक्य आहेस , मला वाचू दे आता, मूड लागलाय वाचयला मस्त
तो: मला पण माझा मूड स्पोइल नाही करायचा आहे , गुड नाईट
ती: आमच्यात गुड नाईट हसऱ्या चेहऱ्याने म्हणतात
तो: आमच्यात हसरा चेहरा असाच असतो
ती: आधी तर (लग्नाच्या) वेगळाच असायचा
तो: आमच्यात नंतर (लग्नाच्या) असा करायची पद्धत नाहीये, पण सोबतच्या लोकांवर अवलंबून आहे ते
ती: तुला खर तर वाचायची आवड आहे, तरी पण तू असा का वागतोस न , ” I dont know “. जावू दे
तो: हो मी पण वाचतो . पण , मी एका वेळी एकच पुस्तक जवळ ठेवतो , ४-५ पुस्तके उशाशी ठेवण्यातले लॉजिक,परमेश्वरालाच ठावूक . पुस्तक वाचणे छान आहे , पण ती पुस्तके छान पण तर ठेवायला पाहिजे न
ती: मला लहान पांपासून अशीच सवय आहे , कधी पण मूड बदलू शकतो आणि मग पुस्तक पण त्या प्रमाणे . मला पुस्तके नसली तर ४-५ जवळ तर नाही चालत आणि हे माहिती असून , मग कशाला बोलायचे . काही लोकांना मोबाईल वाजला तरी न उचलण्याची सवय असते कि , रिप्लाय सुद्धा करत नाही , जसे काही बाकीच कामाशिवाय च रिंग करत असतात .
तो: कोणता विषय कुठे जातोय ?
ती: जिकडे वळवला तिकडेच वाहतोय
तो आणि ती (मनात): इतका वेळ भांडण्या पेक्षा झोपलो असतो तर / निम्मे तरी वाचून झाले असते
तात्पर्य : सकाळी उठायला उशीर , पुस्तक पूर्ण वाचणे आणि फिरायला जाणे दोन्ही चा पोपट
प्रवेश तोच: जुने झाल्यावर ५ वर्षे व नंतर
तो : नवीन पुस्तक आणले आहेस काही वाचायला
ती : नाही , जे हवय ते नाही मिळाले,
तो : जर मिळाले तर
ती : बहार येयील
ती : वाह , गिफ्ट माझ्या साठी ?
तो : म्हणजे काय आणि कुणा साठी
ती : काय सांगता येत नाही आज काल, खात्री केलेली बरी
……………………आणि ती गिफ्ट आहे : टेबल लैम्प, बुक शेल्फ आणि जे हवे आहे ते बुक 🙂
भांडण सुरु होण्यास स्कोप च नाही
ती: मस्त आहे, एक नंबर . मला आठवतंय तू मला दिलेले पहिले गिफ्ट ” पुस्तक संच- बोक्या सातबंडे “त्याच दिवशी वाटले अरे हाच तो , याच्या बरोबर आयुष्य काढता येयील
तो : आणि भांडता पण येयील ….मनसोक्त
ती : अशक्य आहेस तू !!!
तो : मग पुढचा रविवार पक्का न
ती : येस, पक्का, अगदी तुझ्या पहाटे नको , माझ्या पहाटे जावू यात , तू मागच्या वेळी काढलेले तिथले फोटो इतके मस्त आलेत कि, मला आवडेल प्रत्यक्ष पाहायला.
तात्पर्य: हि केवळ “adjustment ” नाही , हे मुरायला लागलेले प्रेम आहे बहुधा !!!!, सवयींची पण सवय होते , काही सवयी आवडतात , काही बदलतात , काही आवडत नाहीत आणि बदलत पण नाहीत,कारण त्या केवळ सवयी नाही तर व्यक्तिमत्वाचा एक भाग असतो अविभाज्य . आपल्याला तो काढून नाही टाकता येत, पण आपण एक तर तो दुर्लक्षित करू शकतो किंवा आपल्या पद्धतीने थोडा वळवू शकतो . खर तर हेच संभाषण दोन भावंडात पण होते, पण त्या निरागस वयात ते नात्यांच्या बांधत,मायेत विरघळून जाते . पण हेच तो आणि ती मध्ये मात्र नक्कीच भांडण होवू शकते …🙂
पण नाते बळकट व्यायचे तर थोडी भांडणे हवीतच नाही का आणि त्याला भांडणच म्हणवे उगाच मतभेत वगैरे नको , म्हणजे मन कसे मोकळे होते, आरश्यासारखे स्वच्छ.
म्हणजे मग कसे आपण निखळ प्रेम करायला आणि आनंद घ्याला रिकामे 🙂
भांडणं सारखी प्रेमामध्ये सजा नाही
पण भांडणाशिवाय नात्यामध्ये काही सुद्धा मजा नाही
भांडणाशिवाय, नात्यांच्या दोन टाका मध्ये
कुणीसुद्धा तिजा नाही
आणि म्हणूनच भांडणाशिवाय प्रेमामध्ये काही सुद्धा मजा नाही
— शीतल जोशी