Marathi Article – भारतमाता की जय… …
कालच दारुण उलूम या प्रमुख मुस्लिम धर्मसंस्थेनी फतवा काढला की भारतमाता की जय कोणत्याही मुस्लिमानी बोलू नये.. त्या मागे त्यांनी बरीच धार्मिक कारणे दिली, की इस्लाम हा एकाच ईश्वर मानतो, ते देशाला देव मानू शकत नाहीत, देशाला देव मानणे म्हणजे धर्म भ्रष्ट वगेरे वगेरे..
असो त्यामुळे, बरेच दिवसांपासून मनात असलेला विषय आज मराठीबोली वर लिहिण्याची इच्छा झाली..
अगदी कन्हैया पासून ते पुण्याच्या फरगूसन्स पर्यन्त .. आरएसएस पासून ते दारुण उलूम पर्यन्त.. बरेच दिवस.. याच बातम्यानी डोके भंडावून गेले आहे…
विषयाच्या सुरूवातीला जाऊ… जेएनयू
अफजल गुरूला फाशी दिल्याच्या दिवशी आयोजित करण्याता आलेल्या एका सभेमध्ये काही विद्यार्थी देश विरोधी घोषणा देतात.. मला माहीत नाही या घोषणा आपण ऐकल्या किंवा नाही ते.. पण या घोषणा ऐकून कोणताही भारतीय त्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये येतील असे मानूच शकत नाही…
भारत तेरे तुकडे होंगे, इंडिया गो बॅक , हर घर से अफजल निकलेगा.. अश्या अनेक घोषणा विद्यार्थ्यानी दिल्या..
मला पडलेले प्रश्न
१. १३ डिसेंबर २००१रोजी संसदेवर हल्ला झाला, १५ डिसेंबर ला अफजल गुरूला अटक झाली.. ४ ऑगस्ट २००५ ला अफजल गुरूला सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा दिली, २२ सप्टेंबर २००५ ला रिव्यू पिटिशन सुप्रीम कोर्टाने रीजेक्ट केली, ऑक्टोबर २००६ मध्ये अफजल च्या बायकोनी राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला, २००७ मध्ये सुप्रीम कोर्टाकडून दयेचा अर्ज फेटाळण्यात आला, ७ सप्टेंबर २०११ ला दिल्ली हायकोर्टाबाहेर बॉम्बब्लास्ट करण्यात आला.. याची जबाबदारी घेणार्या सस्थेने हा अफजल गुरुच्या फाशीच्या शिक्षे विरोधात असल्याचे संगितले..
१६ नोव्हेंबर २०१२ ला राष्ट्रपतिनी अफजल गुरुसह इतर ७ जणांचे दयेचे अर्ज परत पाठवले, सुशील कुमार शिंदे यांनी त्यांचे शेवटचे रेमार्क देऊन अर्ज पुन्हा राष्ट्रपतींकडे पाठवले, आणि ३ फेब्रुवरी २०१३ ला अफजलगुरूचा दयेचा अर्ज राष्ट्रपतिनी फेटाळला, आणि त्यानंतरच ६ दिवसानी ९ फेब्रुवरी २०१३ ला अफजल गुरूला फाशी देण्यात आली..
आता प्रश्न असा आहे, जर अफजलच्या फाशीला विरोध होता तर तो अचानक ३ वर्षानी २०१६ रोजीच का??
जेव्हा अफजल ला फाशी झाली तेव्हाचे सरकार कॉंग्रेस चे होते, सुशीलकुमार शिंदे यांची यात मुख्य भूमिका होती, असे असताना राहुल गांधीचा या निर्णयाला विरोध का??
असो.. संपूर्ण तारखे नुसार सांगण्याचे कारण म्हणजे ही फाशी एका दिवसात नाही दिली किंवा कोणतेही एक सरकार असताना झालेली कोर्ट केस नाही..
या नंतर सुरू झाला खेळ, दोन टिम्स मध्ये .. देशप्रेमी आणि देशद्रोहि..
ज्यांनी देशविरोधी घोषणा दिल्या ते देशद्रोही आणि ज्यांनी हनुमंत्प्पा पासून भगत सिंग पर्यन्त ज्यांचे विषय काढले ते देशप्रेमी.
अर्थात देशविरोधी घोषणा देणे, या मी तरी अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानत नाही.. आणि भारत माता की जय बोलणारर्याला देशप्रेमी पण मानत नाही..
पुढे १५ -२० दिवस टीव्ही पासून वर्तमानपत्रा पर्यन्त ब्रेकिंग न्यूज याच विषयावर असायच्या.. यातच विधानसभा लोकसभा कित्येकदा तहकूब झाल्या.. कन्हैया या विद्यार्थी नेत्याला अटक आणि नंतर सुटका झाली, सुटके नंतरचे त्याचे भाषण ऐकून ए नेक जन भारावून गेले.. अनेकांनी त्याची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदिंशी केली.. शशि थरूरयांनी तर कन्हैयाला भगत सिंग म्हटले… कारण काय तर कन्हैया मोदींच्या विरोधी बोलला.. पण हाच कन्हैया देशविरोधी पण बोलला.. त्याचे काय??
भगत सिंग नि त्यांच्या आयुष्यात कधीच देशविरोधी घोषणा नाही दिल्या, त्या वेळी देशावर इंग्रजांचे राज्य होते, अनेक भारतीय इंग्रजांच्या सेवेत होते, त्यांच्या मुळेच इंग्रजांना इथे राज्य करणे सोपे झाले, म्हणून भगत सिंग नि कधीच भारतीयांना दोष नाही दिला… विरोध करावा आणि करायलाच पाहिजे.. पण तो कोणत्या पद्धतीने करतोय हे ही महत्वाचे आहे.. भगत सिंग नि असेंबली मध्ये बॉम्ब फोडले पण ते फोडताना अश्या ठिकाणी फोडले की कोणाला इजा होणार नाही.. विरोधाची पण एक पद्धत असते, क्रांतिकारकांनी हातात बंदुका होत्या म्हणून सामान्य भारतीयांना मारले नाही.. त्यांचा लढा इंग्रजांविरुदध होता.. देशातील जाणते विरुद्ध नाही..
हा विषय थंड होतोच नाही तर, ओवेसी या महाशयांनी मानेवर चाकू ठेवला तरी भारत माता की जय बोलणार नाही असे विधान केले.. या विधाना नंतर पुन्हा एकदा देशप्रेमी विरूद्ध देशद्रोहि सामना सुरू झाला.
मी तरी या ओवेसी महाशयांना एवढेच सांगीन, तुझ्या भारत माता की जय न म्हणण्याने माझा देश काय कमी महान होणार नाही, की तू भारत माता की जय म्हटलास म्हणून देशाची महानता वाढणार नाही..
मुळात माझा भारत देश हा महान आहे तो महानच राहणार..
आपण आरे ला कारे बोलणे बंद केले पाहिजे, तुला भारत माता की जय नाही बोलायचे नको बोलू.. त्यांनी मला किंवा माझ्या देशाला काही फरक पडत नाही, पण याचा अर्थ असा नाही की भारत मातेला काहीही बोललेलो आम्ही ऐकून घेऊ..
काहि लोक हे मुद्दामून प्रसिद्धीसाठी असे विचार मांडत असतात.. आज कोणी भैय्याजी जोशी यांनी भगवा ध्वज हा आपला ध्वज असावा असा विचार मांडला.. आता पुढील काही दिवस टीव्ही वर नवीन चर्चासत्र दिसणार..
प्रत्येक पक्षात चांगली वाईट लोक असतात.. पण कोणाला किती महत्व द्यायचे हे सामान्य भारतीयांनी ठरवायचे..
खरे तर सामन्याच्या आयुष्यात हे धर्म जाती कधीच मध्ये येत नाहीत.. लोकल मध्ये गर्दीत चढणारा बाजूंनी मुस्लिम चढतोय की ख्रिच्छन याचा विचार पण करत नाही, कित्येकदा मुस्लिम हिंदूला जागा देतो, हिंदू मुस्लिमला जागा देतो.. पण आपल्यात भांडणे लावतात ती ही जी लोक आहेत, आपण त्यांना महत्व देणे बंद केले पाहिजे.. हिंदूंनी साध्वी भैय्याजी किंवा इतर अश्या लोकांकडे आणि मुस्लिमानी ओवेसी किंवा फतवे देणार्या लोकांकडे लक्ष देणे बंद केले.. की यांचे असे बोलणे आपोआप बंद होईल..
या बाबतीत नरेंद्र मोदींचा दृष्टीकोण खरच आवडतो.. अश्या गोष्टींवर ते बोलत नाहीत.. करे यावर बोलणे म्हणजे विषय वाढवणे.. यूपी मध्ये दादरी मध्ये एका मुस्लिमाची काही हिंदूंनी मिळून हत्या केली.. गोष्ट खरेच वाईट आहे आणि निंदनीय पण, पण या एका घटनेणी संपूर्ण देश असंवेदनशील कसा होऊ शकतो.. ??
आत्ताच मागील आठवड्यात दिल्ली मध्ये एका हिंदू डॉक्टरची हत्या झाली, ही बातमी मी सोशल नेटवर्क वर वाचली .. कदाचित टीव्ही वर लागून गेली असेल.. पण आता सगळे चूप…
मी वरती मुद्दामूनच दोघांचे धर्म संगितले, खरे तर बातम्या या धर्म किंवा जातीच्या उल्लेखा शिवायच यायला पाहिजेत.. दादरीमद्धे एका घरात घुसून जमावाने केली हत्या, किंवा दिल्लीमध्ये एका डॉक्टरची छोट्या वादातून हत्या..
नावापुढे धर्म लावला की संपूर्ण समाज त्यात खेचला जातो.. देशद्रोहि आणि देशप्रेमी सामना सुरू होतो..
असा सामना आता पुढील अनेक दिवस महीने किंवा वर्ष चालत राहील..
पण माझा भारत महान आहे, महान होता आणि महानच रहिल… मग तुम्ही भारत माता की जय बोला किंवा बोलू नका…
Marathi Article – भारत कधी कधी माझा देश आहे
Marathi Article – सत्यमेव जयते
यमाचिये व्दारी।
माझा शेतकरी ।।
भिक मरणाची।
मागतसे।।धृ।।
राब राब राबे।
रोज तो शेतात।।
काही मिळे नाही।
त्याचे हातात।।१।।
कर्जे काढूनिया।
शेती तो करीतो।।
व्याजात भरीतो।
पिके सारी।।२।।
पिकलं पिकलं।
बक्कळ पिकलं।
भावात विकलं।
भजियाच्या।।३।।
सरकार करे।
पँकेज जाहिर।।
केल पसार या।
दलालांनी।।४।।
एका बंधार्याचे।
तिनवेळा बिल।।
अजुनिया वल।
शेता नाही।।५।।
आला जिवा खेव।
लाथाडतो देव।।
मरणाचे भेव।
विसरलो।।६।।
म्हणुनिया त्याचे।
क्षीण झाले मन।।
यमापुढे मागे ।
तो मरण।।७।।
श्रीकांत धोटे
मु. टाकळी चनाजी पो. वायगाव ( नि.)
ता. देवळी जि. वर्धा
मो. नं. 7875031852
shrikantdhote29@gmail.com
Modify message