

Marathi Kavita – Imarat – इमारत
कवि – श्रीपाद टेंबे
सिमेंट काँक्रीटच्या महानगरामध्ये
सर्वजण व्यस्त आणि आहेत मस्त
उंचच उंच इमारती
ज्यांना नाही आत्मा, जो आहे भावनाहीन
त्यांना गरज नाही अन्न वस्त्राची
म्हणून इमारती आहेत महान, आहे त्यांची शान
मात्र सर्वसामान्य आहेत परेशान
सुंदर इमारतींच्या ह्या शहरात
विद्रूप झाला आहे चेहरा समाजाचा
अन्नावीण तडफडणारे जीव
कामधंद्याशिवाय व्यसनात भरकटणारे तरुण
सर्वच आहेत व्यस्त मेळावे अन् शिबीरात
कारण या शहरातील इमारती मृतप्राय
जिवंत आहे फक्त स्वार्थ आणि फक्त स्वार्थ
अंतहीन स्वप्नांच्या वाळवंटात
भरकटत आहे जन्म मृत्यूचा
भोग भोगत आहे हा जनसागर
ह्या सिमेंट काँक्रीटच्या जंगलात…………!!!!!
———————————————————————————————-
श्रीपाद टेंबे.