Engineering : अभियांत्रिकी पदविका….नवनिर्माणाचा ध्यास की नुसताच अभ्यास…?

4
1977

Engineering : अभियांत्रिकी पदविका….नवनिर्माणाचा ध्यास की नुसताच अभ्यास…?

Engineering

महाराष्ट्रा मध्ये एकूण १५० च्या आसपास अभियांत्रिकी महाविद्यालये आहेत…त्यात एकूण ५०,००० विद्यार्थी शिक्षण घेतात..म्हणजे दरवर्षी एकट्या महाराष्ट्रातून ५०,००० अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून बाहेर पडतात…
तर संपूर्ण भारतातील हा आकडा ५ लाखांच्या आसपास आहे…
एवढे अभियांत्रिकी असून सुद्धा… भारत देश हा फक्त सेवा क्षेत्रातच अग्रेसर आहे…?? याचा थोडा विचार केला तर समजते…
या ५ लाख अभियांत्रीकांपैकी ४०% म्हणजेच २ लाख अभियांत्रिकी हे व्यवस्थापनाचे शिक्षण घेतात…१५% अभियंते हे अभियांत्रिकी मध्ये मास्टर्स करतात.. ५ % अभियंते हे अध्यापन क्षेत्रात प्रवेश करतात.. ५% पुढील शिक्षणासाठी परदेशी जातात.. २५% अभियंत्यांना दरवर्षी नोकर्या मिळतात…तर १०% अभियंते हे नोकरी शोधात असतात..

या वरून हे लक्षात येते की…फक्त ३० ते ४०% विद्यार्थी हे अभियांत्रिकी क्षेत्रात काम करतात….
भारताचा सेवा क्षेत्रामध्ये जगात अग्रक्रम लागतो तो याच कारणामुळे….करणं दरवर्षी भारतात २ लाख किंवा त्यापेक्षाही अधिक सुशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध असते..
कारण यातील ९०% हून अधिक अभियंते हे फक्त नोकरीच्या शोधात असतात….काहीतरी नवीन करावे…काही नवीन शोधावे…अशी नुसती इच्छा पण यांच्यात नसते…
यात यांचा पण काहीच दोष नाही…महाविद्यालयांमध्ये यांना फक्त परीक्षेपुरतच  शिकवले जाते..

मागील वर्षी आलेल्या ३ इडीयट या चित्रपटामध्ये देखील भारतातील याच परीक्षेपुरात्याच शिक्षणावर भाष्य केले आहे…
सेवा क्षेत्रामध्ये सर्वाधिक मोठे क्षेत्र हे माहिती व तंत्रज्ञानाचे आहे….यामुळे…अनेक इलेक्ट्रोनिक्स किंवा इलेक्ट्रोनिक्स टेलिकॉम केलेले अभियंते सुद्धा या क्षेत्राकडे वळतात..

खरेतर माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रापेक्षाही अधिक वाव त्यांना त्यांच्याच क्षेत्रात कार्य करून मिळू शकतो…
अभियंते हे फक्त सेवा पुरवण्याचे किंवा व्यवस्थापनाचे काम करू लागले तर नवनिर्माण कोणी करायचे….
की परदेशी कंपन्यांना सेवा पुरवण्यासाठीच आम्ही अभियंते होतो…? हा विचार प्रत्येक अभियंत्याने केला पाहिजे…

नवनिर्माण म्हणजे काही खूप मोठे आणि अशक्य असे काही काम नाही…
फेसबुक बनवणे हे काही खूप कठीण काम नव्हते…की ही कल्पना पण काही नवीन नव्हती….या आधी पण अश्या कल्पना अनेकांना आल्या…
पण ज्यानी ही कल्पना अस्तित्वात उतरवली तोच जिंकला…आज तो सर्वात लहान श्रीमंत उद्योगपती आहे…

भारतीय अभियंत्यांना पण तेवढाच अधिकार आहे…श्रीमंत होण्याचा…स्वताच्या कल्पना पूर्ण करण्याचा…
यासाठी गरज आहे ती फक्त विश्वासाची…
जे काम आम्ही दुसर्यांसाठी करू शकतो…ते काम स्वतासाठी पण करूच शकतो…

आज काल तर अनेक अभियंते अभियांत्रिकी करून नंतर व्यवस्थापन करतात…आणि एखाद्या बँकेमध्ये गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवतात..
अश्या अभियंत्यांना एकाच प्रश्न…जर बँकेमधेच काम करायचे होते तर अभियांत्रिकी पदविका कशासाठी केली..???
असो..
अभियंता हा निर्माणकर्ता असतो…निर्माण हे त्याच्या नसा नसात असायला हवा..
थोडासा शिक्षण व्यवस्थेतील बदल, स्वतावरील विश्वास आणि नवनिर्माणाचा ध्यास…यामुळेच खरा अभियंता तयार होईल…

4 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here