Engineer But Clerk – अभियंता पण कारकून

1
1512

Engineer But Clerk – अभियंता पण कारकून

नमस्कार मित्रांनो,

लेखाचे नाव थोडे विचित्र वाटते ना? पण सत्य तेच आहे.

engineering

नुकताच दहावी आणि बारावीचा निकाल लागला, ९०% वरील अनेकांच्या मुलाखती टीव्ही वर बघितल्या, प्रत्येकाला अभियांत्रिकि किंवा वैद्यकीय शिक्षण घ्यायचे आहे. पण एका गोष्टीचे वाईट पण वाटले मी बघितलेल्या २०-२५ मुलाखतीमधील एकाने पण मला उद्योजक व्हायचे आहे असे म्हटले नाही… 🙁

आज महाराष्ट्रात वर्षाला १० नवीन अभियांत्रिकी महाविद्यालये तयार होत आहेत, दरवर्षी लाखो अभियंते शिक्षण पूर्ण करत आहेत. पण एक प्रश्न प्रतेक अभियंत्याने स्वताला विचारावा काय तो खरच अभियंता आहे?

की फक्त अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले, एक मस्त नोकरी लागली .. म्हणजे मी अभियंता आहे?

भारतातून लोह खनिज निर्यात होते आणि स्टील आयात होते, म्हणजे आपण कच्चा माल विकतो आणि दम दुप्पट दराने तयार माल विकत घेतो. हेच अभियंतिकी क्षेत्रात पण होते.

आज देशात लाखो संगणक अभियंते आहेत, जे विदेशी कंपन्यांसाठी नोकर्‍या करतात आणि याच विदेशी कंपन्यांनी बनवलेले सॉफ्टवेअर आपण पुन्हा आपल्या देशात आयात करतो.

नोकरी करणे वाईट आहे असे माझे मत नाही… आणि सर्वांनी व्यवसाय करावा असा हट्ट पण नाही.

पण देवाने दिलेल्या दोन हाताने नोकरी करायची की नोकर्‍या वाटायच्या हे ज्याचे त्याने ठरवावे.

अनेकदा आपण उदाहरण सांगतो… पेट्रोल पंपावर काम करणारे धिरूभाई …कसे करोडपती झाले, तर ऑफिसेस मध्ये टेलीफोन पुसणारे डी.एस.कुलकर्णी कसे उद्योजक झाले.

हे दोघेच नाही असे हजारो आहेत… पण लाखो नाही…

कारण आपण स्वताला एक संधीच देत नाही, प्रत्येकाच्या मनात एक स्वप्न असते, पण इतरांची स्वप्न पूर्ण करताना आपण स्वताचे स्वप्न विसरतो.

अभियंते हे फक्त सेवा पुरवण्याचे किंवा व्यवस्थापनाचे काम करू लागले तर नवनिर्माण कोणी करायचे….
की परदेशी कंपन्यांना सेवा पुरवण्यासाठीच आम्ही अभियंते होतो…? हा विचार प्रत्येक अभियंत्याने केला पाहिजे…

प्रत्येकाचा उद्योग अगदी अंबानि सारखा मोठा होईलच असे नाही, पण जे कराल ते खूपच सुंदर असेल, सकाळी नोकरीला जाताना स्वताला फक्त एक प्रश्न विचारा, मी का जातोय, मी खरच खुश आहे?

उत्तर जर होय असेल तर खुशीत नोकरीला जा, पण उत्तर नाही मिळाले तर समजा बदलाची वेळ जवळ आली आहे.

तुमच्या मेहनतीचा फायदा फक्त तुम्हाला झाला पाहिजे, तुमच्या बॉस ला किंवा कोणत्या विदेशी कंपनीला नाही.

आज अनेक अभियंते वर्षानु वर्षे एकच काम करत आहेत, त्यात त्यांनी खूप प्रावीण्य संपादन केले आहे, पण त्याचा त्यांना पगार वाढण्याशिवाय दूसरा कोणताच फायदा झालेला नाही.

ते फक्त त्यांच्या बॉस च्या हाताखालील कारकून होऊन राहिले, आठवड्यातून एकदा एक्सेल मध्ये स्टेटस देणारे, कॉपी पेस्ट करत डॉक्युमेंट बनवणारे, आणि प्रोग्राम मधली एरर पण गुगल वर शोधणारे कारकून.

अभियंता हा निर्माणकर्ता असतो…निर्माण हे त्याच्या नसा नसात असायला हवा..

विचार तुम्हाला करायचाय तुम्ही अभियंते आहात की कारकून?

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here