Elizabeth Ekadashi Marathi Movie – एलिझाबेथ एकादशी

0
3694

Elizabeth Ekadashi Marathi Movie – एलिझाबेथ एकादशी


marathi-movie-elizabeth-ekadashi

दिग्दर्शक – परेश मोकाशी

निर्माता – मयसभा प्रॉडक्शन आणि एस्सेल विजन

लेखक – मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी

संगीत – आनंद मोडक

कलाकार – श्रीरंग महाजन (ज्ञानेश), सायली भंडारकवठेकर(मुक्ता), पुष्कर लोणारकर, नंदिता धुरी, वनमाला किनीकर,  चैतन्य कुलकर्णी, अश्विनी भालेकर, अनिल कांबळे, दूरगेश बडवे,चैतन्य बडवे.

हरिश्चंद्राची फॅक्टरी(२००९) या चित्रपटाच्या यशानंतर दिग्दर्शक परेश मोकाशी एलिझाबेथ एकदाशी हा चित्रपट मराठी रसिकण समोर घेऊन आले आहेत, एलिझाबेथ एकादशी हा चित्रपट १४ नोव्हेंबर म्हणजेच बालदिनी प्रदर्शित झाला. चित्रपटाचे नाव एलिझाबेथ एकादशी या मागची कथा थोडीफार चित्रपटच्या ट्रेलर मधून समजत असली तरी ती लपवण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे.

चित्रपटामध्ये एकही स्टार कलाकार नाही, श्रीरंग महाजन, सायली भंडारकवठेकर आणि पुष्कर लोणारकर हे लहनगेच चित्रपटाचे स्टार आहेत. ट्रेलरमध्ये दिसणारं ज्ञानेश म्हणजेच श्रीरंगचं प्रवचन, झेंडु म्हणजेच सायलीचं “गरम बांगड्या घ्या गरम बांगड्या” हा डायलॉग आणि गण्या म्हणजेच पुष्करच्या स्पेशल शिव्यांमुळे  ह्या चित्रपटाचा ट्रेलर ही अल्पावधीत लोकप्रिय झाला असून या तिघांवर चित्रीत केलेलं “दगड दगड” ह्या गाण्याची ही सर्वत्र जोरदार चर्चा आहे.

पंढरपुरची पार्श्वभूमी आणि कार्तिकी एकादशीच्या उत्सवात घडणारी एक धम्माल गोष्ट या चित्रपटात बघायला मिळणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here