Marathi Kavita – कोरोना

0
258
Marathi-kavita-CORONA

Marathi Kavita – कोरोना

अरे कोरोना सांग तुला
हवे तरी आहे काय ?
एवढे घेतलेस जीव तरी
तुझे समाधान झाले न्हाय ।

क्षणात केलेस वेगळे का तू
आईपासून तान्हे बाळ ,
आहेस तरी कोण असा तू
तुला राक्षस म्हणू की काळ ।

हरकत नाही छळलेस जरी तू
आज आम्हा मानवजातीला,
तुटणार नाही मातीची नाळ
आम्ही गाडू तुला याच मातीला ।

घाबरणार नाही आम्ही तुला
भलेही ऊपासपोटी घरात राहू,
काळजी घेऊन आम्ही एकमेकांची
पण अंत तुझा पाहू ।

*************************************

वास्तववादी कवी,
प्रवास मोहिते-पाटील
9881770648
पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here