Aamcha Baap aan Amhi – आमचा बाप अन आम्ही

0
6236

Aamcha Baap aan Amhi – आमचा बाप अन आम्ही

Aamcha Baap an Amhi

दलित समाजात जन्म आणि दारिद्र्य यांमधून येणार्‍या प्रतिकूल परिस्थितीवर, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेने निग्रहपूर्वक मात करत, त्यांच्या वयाच्या एकवन्नाव्या वर्षी भारतीय रिझर्व बँकेचे प्रधान आर्थिक सल्लागार आणि प्रमुख अर्थ तज्ञ म्हणून कार्यकारी संचालकाच्या पदावर नियुक्त झालेले, अफगाणिस्तान सरकारचे प्रमुख आर्थिक सल्लागार म्हणून काम करणारे, मराठी आणि इंग्रजीतले सिद्धहस्त लेखक, सामाजिक बांधीलकीचे वसा घेतलेले नामवंत शिक्षणतज्ञ आणि एक प्रसन्न व प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून सर्वांना परिचित असलेले डॉ. नरेंद्र जाधव यांचे ‘आमचा बाप आणि आम्ही’ हे पुस्तक अतिशय गाजलेले असून या पुस्तकाचे अनेक भारतीय व परदेशी भाषांमध्ये अनुवाद झालेले आहेत.

मराठीबोली च्या संपर्कात राहण्यासाठी आपला इमेल आयडी द्यावा:

महत्वाकांक्षा आणि तीव्र इच्छाशक्ती असल्यास आर्थिक परिस्थितीवर मात करून कशा प्रकारे आपले ध्येय गाठू शकतो हे त्यांनी व त्यांच्या भावंडांनी उच्च शिक्षण घेऊन करून दाखवले आहे. ही संपूर्ण भावंडे कशी घडलीत याची गाथा या पुस्तकात नमूद केली आहे. याच पुस्तकातून आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनातील दूषणानचे प्रखर दर्शन घडते.

“डॉ.नरेंद्र जाधव यांचे आयुष्य म्हणजे बदलाची, असीम शौर्‍याची, उत्कर्षाची आणि आशेची कहाणी आहे, यामधून आपल्या देशातील लाखो-करोडो लोकांना नवे सुखसमाधानाचे जीवन जगण्या साथी लढा देण्याचे स्फुरण याची माला खात्री आहे.” पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग.

‘आमचा बाप अन आम्ही'(Aamcha Baap aan Amhi) हे पुस्तक विकत घेण्यासाठी क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here